logo

नांदेड, घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात आरोपीने दीड लाखांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी किनवट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

किनवट तालुक्यातील बोधडी येथील सेवासिंग रामचंद्र साबळे यांच्या घरी सलीम अहेमदखान हुसेन हे भाड्याने राहतात. दि. 14 रोजी सकाळी 6 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून  दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेवरून सलीम अहेमदखान हुसेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

लग्नात 25 हजारांचे पॉकेट मारले
गावातील व्यक्तीच्या मुलीचे लग्न लावण्यासाठी मंगल कार्यालयात आले असता मंगल कार्यालयातून पॅन्टच्या खिशातील 25 हजार रूपये व बॅंकेचे कागदपत्रे असलेले पॉकेट चोरून नेल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

हडको येथील दत्तकृपा मंगल कार्यालयात नागनाथ किशनराव शेनकुडे हे दि. 14 रोजी आपल्या गावातील व्यक्ती नारायण पेरके यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले असता लग्न लाऊन जेवणासाठी जात असताना गावातील एका व्यक्तीने पॅन्टच्या मागच्या खिशातून पॉकेट मारले. या पॉकेटात 25 हजार रूपये नगदी, एटीएम कार्ड, आधार कार्ड व बॅंकेचे पासबुक होते. सदरील व्यक्तीने पॉकेट मारल्याप्रकरणी नागनाथ शेनकुडे यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली असता ग्रामीण पोलिसांनी सदरील व्यक्तीविरूद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे

    Tags