logo

किनवट, येत्या 29 मे रोजी होणार्या सातव्या मातंग समाज सामूहिक विवाह सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. दिलीपराव कांबळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत; अशी माहिती आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी दिली आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 29 मे 2017 रोजी किनवट येथील लहूजी साळवे नगरी (कलावती गार्डन) येथे दुपारी 12.35 वाजता सातव्या मातंग समाज सामूहिक विवाह मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. दिलीपराव कांबळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहावेत म्हणून सदरील मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी मेळावा संयोजन समितीचे अध्यक्ष शंकर भंडारे, संयोजक मधूकर अन्नेलवार, आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, संयोजन समिती सदस्य रवि उप्परवार, भगवान मारपवार, नरेश माहूरकर, रवि दिसलवार, रमेश दाशलवार, प्रमोद सुद्दलवार यांनी राज्यमंत्री ना.कांबळे हे हिंगोली दौर्यावर आले असतांना 1 मे रोजी त्यांची भेट घेऊन या मेळाव्याला येण्याची विनंती करून निमंत्रीत केले. या सामूहिक विवाह मेळाव्यास मी निश्चितच उपस्थित राहीन असे आश्वासन ना. कांबळे यांनी दिले असल्याचे आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी सांगितले आहे.

    Tags