logo

BREAKING NEWS

तीन चोऱ्यांमध्ये एक लाख 11 हजार रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड, तीन वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये एक लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना पोलीस दप्तरी दाखल झाल्या आहेत.

सुचिता शरद जयस्वाल यांनी किनवट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 15 मेच्या सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातील काम करणारी महिला हिने घरातील कपाटात ठेवलेले चार तोळे सोन्याचे गंठण किंमत 55 हजार रुपयांचे चोरुन नेले आहे. किनवट पोलिसांनी त्या महिलेविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून, तपास  पोलीस हवालदार शेख करीत आहेत. दुसऱ्या घटनेत 15 मे रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पंचायत समिती कंधार येथून आपली मोटारसायकल क्र.एमएच-26-एजी-8377 तीस हजार किंमतीची कोणीतरी चोरुन नेल्याची तक्रार संतोष बालाजी सूर्यवंशी यांनी दिल्यावरुन  कंधार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत. तिसऱ्या एका घटनेत संजिवनी हॉस्पिटल नांदेड येथे दि.16 मे रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे सहा वाजेच्या दरम्यान विशाल विश्र्वंभर परभणीकर हे आपल्या रुममध्ये झोपले असताना त्यांच्या खिश्यातील वीस हजार रुपये रोख रक्कम, एक मोबाईल सहा हजार रुपये किंमतीचा असा 26 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस हवालदार  गिते करीत आहेत.    Tags