LOGO

अल्पवयीन बालिकेला पळवून, अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या युवकाला पोलीस कोठडी

रामप्रसाद खंडेलवाल - 2017-05-18 18:03:42 - 1514

नांदेड, एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेवून तिच्यासोबत अत्याचार करुन तिला गर्भवती करणाऱ्या 24 वर्षीय युवकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

किनवट तालुक्यातील एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार 22 फेब्रुवारी 2017 रोजी त्यांची मुलगी शाळेला गेली. तिचे वय 16 वर्ष आहे. आणि तिला तुषार दत्ता राठोड (24) रा.दयाल धानोरा तांडा ता.किनवट याने पळवून नेले आहे. याबाबत इस्लापूर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 363, 366 आणि 366 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला. 22 फेब्रुवारी रोजी पळवून नेलेली युवती 16 मे 2017 रोजी परत आल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्यात त्या बालिकेने सांगितले की, मागील तीन वर्षापासून माझे आणि तुषार राठोडचे प्रेमसंबंध होते. 22 फेब्रुवारी 2017 रोजी मी शाळेत गेले असताना तेथे तुषार कार घेवून आला होता आणि त्या कारमध्ये बसून आम्ही दोघे हैद्राबाद तेथून तिरुपती आणि पुन्हा हैद्राबाद असे आलो आणि हैद्राबाद येथे लॉजमध्येच राहिलो. या दरम्यान आलेल्या शारीरिक सबंधातून मी सध्या गर्भवती आहे. या जबाबानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात भादंविच्या कलम 376 आणि बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 3 आणि 4 ही वाढ केली. काल दि.17 मे रोजी तुषार दत्ता राठोडला अटक करण्यात आली. आज इस्लापूरचे सहायक पोलीस निरीक्षक एस.डी.महल्ले, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्र्वर सरोदे, साई पुयड, विजय नंदे यांनी तुषार राठोडला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.संजय लाठकर यांनी पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली ती मान्य करुन न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी तुषार राठोडला चार दिवस म्हणजेच 22 मे 2017 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Tag:
Download our mobile app here :

Contact us

C/O Utkarsh PhotoGallary,
Narsinha Digital photo,
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar
Dist. Nanded. Pin - 431802.

+91 9764010107, +919767121217, +919420538747.

02468-244739

anilmadaswar@gmail.com,
nandednewslive@gmail.com,

Back to Top