Breaking news

सिंचन बैठक.. हजारो शेतकर्‍यांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती!

माहुर(प्रतिनिधी)मिनी बारामती करण्याचे स्वप्न उराशी बाळगून परीसरातील शेती सिंचना खाली यावी म्हणून आ.प्रदिप नाईकांनी मंजुर केलेल्या सात पैकी तिन साठवन तलावाचे काम पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आज दि.04(शनीवार)रोजी मोहपुर येथे आ.प्रदिप नाईक यांच्या अध्यक्षते खाली तर मा.आ.शंकरअन्ना धोंडगे,सहायक जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड,नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,साजीद खान,सभापती दिनकर दहिफळे,जिप सदस्य समाधान जाधव,मधुकर राठोड, यांच्या सह अनेक मान्यवरां सह हजारो शेतकऱ्यांचा उपस्थितीत सिंचन आढावा बैठक संपन्न झाली.

किनवट माहुर विधानसभा मतदारसंघात सात साठवण तलाव आघाडी शासनाच्या काळात आ.प्रदिप नाईक यांनी मंजूर करून आनले होते,त्या पैकी तिन दिगडी 118 कोटी,साकुर 110 कोटी ,मोहपुर 122 कोटी,असे 350 कोटीचे बंधारे पुर्ण झाले असुन त्यातील पाणी रोखुन ठेवल्याने पैनगंगा नदी 32 की.मी पर्यंत दुभडी भरुन वाहतआहे.शिवाय एक बंधार्या खाली साडे चार हजार हेक्टर जमिन वलिता खाली येत असल्याने तिन बंधार्या मुळे 36 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.या निमित्ताने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थाना वरुन बोलतांना आ.प्रदिप नाईक म्हणाले की,सहस्त्रकुंड ते उनकेश्वर पर्यंत या टोकातुन त्या टोकापर्यंत वाहणारी पैनगंगा नदी बारा महिने हि पुरा सारखी भरुन वाहावी आणी शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने मोहपुर, दिगडी,हिंगणी, मनीराम थड,उनकेश्वर,येंदा पेंदा, खालचा मारेगाव,या परीसरात सात साठवन तलाव मंजुर करुन आनले,या पैकी अभाराण्यामुळे खालचा मारेगाव चे काम थांबले होते,त्याला हि मंजुरी मिळाली आहे.तर मनीराम थड प्रकल्पाच्या बधित शेतकऱ्यांना मुआवजा मिळाला नसल्याने केवळ दहा कोटी रुपयांचा निधी साठी हे काम थांबले आहे.आज ज्या मोहपुर बंधार्यावर आपन बसलो आहोत त्या एका बंधार्या मुळे साडे चार हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असुन पुर्ण झालेल्या तिन बंधार्या मुळे 15 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी.आ.शंकर अन्ना धोंडगे म्हणाले की सात साठवन तलावाची निर्मीती करणारे आ.प्रदिप नाईक हे कै.शंकराराव चव्हाण साहेबा नंतरचे मराठवाडय़ातील भगीरत असुन माजी मंत्री सुरेश धस,राजेंद्र टोपे यांना जे जमले नाही ते आ.प्रदिप नाईक यांनी करुन दाखविले असुन ते अभिनंदनास पात्र आहेत.राजकारणात नेते मंडळी करतात तिळ भर अन सांगतात गावभर,पण आ.प्रदिप नाईकांनी या जलक्रांतीची कुठेच वाच्यता केली नसुन कार्यक्रमा स्थळी सादा बॅनर हि लावलेला नाही.सत्ताधारी भाजपाच्या मुख्यमंत्र्याला या बंधार्या ची कानोकान खबर नाही हे आनंदाची बाब असुन खबर लागली असती तर जलपुजनाचा चान्स त्यांनी सोडला नसता असे म्हणत खिल्ली उडवली.

सहाय्यक जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड यांनी ही आपल्या आभ्यासपुर्ण भाषनात शेती व शेतकऱ्यांना साठवन तलावाचे फायदे कसे व कीती यावर मार्गदर्शन केले.प्रस्ताविकात बंडु पाटिल भुसारे यांनी विजसमस्येवर प्रकाश टाकत दोन 33 के.व्ही. उपकेंद्राची आवश्यक्ता असल्याचे निर्देशनात आनुन दिले.यावेळी सभापती दतराव मोहिते,पस सदस्य मारोती रेकुलवार, प्रकाश गब्बा राठोड,विशाल जाधव,प्रविन मॅकलवार,सलिम मदार,शेखर नेम्मानिवार,किशोर चव्हाण,राहुल नाईक,मेघराज जाधव,नगरसेवक रहमत अली,गोपु महामुने,तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,यांच्या सह कृषी,पस,महसुल,सा.बा,विजवितरण कंपनी,लघु पाटबंधारे व ईतर विभागाचे अधिकाऱी व कर्मचारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.संचलन अर्जुन इवळेश्वर यांनी तर आभार तालुकाध्यक्ष समाधान जाधव यांनी म्हाणले.

Related Photos