मुंगी बनुन साखर खानार्या आ.प्रदिप नाईकांचे धोंडगेकडून कौतुक!

माहुर(प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्य़ातच नव्हेतर मराठवाड्यात कासवाच्या गतीने जलक्रांती करुन पुढे पुढे करणार्या ससा वर मात करून आ.प्रदिप नाईक यांनी तब्बल नऊ शे कोटीचे साठनव तलाव बांधुन वानोळा व मोहपुर जिप गटात तब्बल 32 की.मी पाणी पैनगंगा च्या पात्रात कोंडुन सात पैकी तिन बंधारे लोकार्पण करुन जलदुत या पदविला ते प्राप्त झाले आहेत.त्या मुळे मराठवाडय़ातील अधुकीन राजा भगीरथ बनलेल्या आ.प्रदिप नाईकांचे अंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त मन्याडचे वाघ कंधार चे माजी.आ.शंकर अन्ना धोंडगे यांनी जलक्रांती बाबत सिंह हि उपमा देउन त्यांचे जाहीर कौतुक केले आहे.

विशेष उल्लेखनीय बाब असी की,लोकार्पण समारोह होई पर्यंत या चार टिएमसी पाणी कोंडुन ठेवण्यात आलेल्या साठवन तलावा बाबत वाच्यता होउ दिली नाही.त्याची हि धोंडगेनी प्रशंसा करत माहुर तालुक्यातील लोकांनी पश्चिम महाराष्ट्रा प्रमाने नाईकांचे फोटो घरोघरी लाऊन त्यांना डबल हॅटट्रिक साठी आशिर्वाद द्यावेत अशी पुष्टी ही जोडली.गेल्या बारा वर्षात माहुर किनवट मतदारसंघात आमदारकीच्या रुपाने निरपेक्ष सालदारी करणार्या आहेत. नाईकांनी कुठेही फुशारकी न मारता महाराष्ट्रातील राज्यकर्ता जमातीस,जी साब!हा साब!करत गुपचुप पणे प्रशासकीय पातळीवर मधुर संबध ठेउन सात बंधारे तेहि आतिदुर्गम आदिवासीबहुल भागात आणुन मंत्र्याना हि लाजवेल असे कार्य करत परीसर सुजलाम सुफलाम केला आहे.मुख्यमंत्री च्या मनात आले तरी सात साठवन तलाव मंजुर करता येत नाहीत ते आ.प्रदिप नाईक यांनी करुन दिल्याबद्दल प्रशंसा केली.येवढेच नव्हे तर गोदावरी खोर्‍यातील पाणी पण निर्बंध असतांना देखील आदिवासींच्या नावाचा उपयोग करुन साठवन तलावाची परवानगी मिळविल्याने जाहिरात सभेत उघड झाल्याने त्यांचे विरोधक पण आपोआपच नामोहरम झाले आहेत.

विष्णुपुरी बंधार्या मुळे कै.शंकराराव चव्हाण साहेब आजरमर झाले असुन आ.नाईक पण सात बंधार्या मुळे वानोळ्या पासुन बोधडी पर्यंत शेतकऱ्यांचे तारण हार बनले आहेत.परंतु आता युती शासन असल्यामुळे खासदार काँग्रेस चा व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस चा असल्याने पाणी खेचण्यासाठी विजवितरण कंपणी कडुन माहुर शहरात 132 के व्ही व या बंधार्याक्षेत्रात 66 के.व्ही उपकेंद्र उभारले नाही तर हे जल साठे मृत ठरणार आहेत.आदिवासी उपयोजनेचा अंतर्गत निधी उपलब्ध असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी भारुड यांनी दिली असली तरी ना.चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ प्रेमाच्या बाहेर येऊन दरिद्र नारी माहुर तालुक्यावर मेहरबान होतील काय हा यक्ष प्रश्न आहे.

Related Photos