Breaking news

सोनापिर बाबाच्या उर्साला संदलने सुरवात! आ.प्रदिप नाईक यांनी चढवली दरगाह वर चादर!

माहुर(प्रतिनिधी)येथील हजरत सनाउल्ला शहा उर्फ सरकार सोनापिर बाबा र.अ.यांचा उरुस उत्सव दि.5 मार्च ते 10 मार्च अखेर साजरा होत आहे. काल दि.५ (रविवार)रोजी आ.प्रदिप नाईक यांनी संदल मिरवणुकीत सहभागी होउन दरगाह वर चादर चढवली. यावेळी त्यांचा समवेत नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, जिप सदस्य समाधान जाधव, सभापती दतराव मोहिते, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, नगरसेवक रहमत अली, रफीक सौदागर,प्रा.भगवान जोगदंड,यांची उपस्थिती होती.

माहुर व परिसरातील सर्व धर्मिय बांधव हा उरुस उत्साहाने साजरा करतात.राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या या उरुस मध्ये शहर व परिसरातील सर्व धर्मिय भाविंकांचे श्रद्धास्थान असणार्‍या या दर्ग्याचा साला बादप्रमाणे मार्च महिन्याच्या 5 तारखे ला साजरा होणारा उरुस उत्सव परिसरातील सर्वधर्मिय बांधव उत्साहाने साजरा करतात. त्यामुळे हा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक बनला आहे.

हिंदू - मुस्लिमांच्या श्रद्धास्थानाला दरवर्षी महाराष्ट्र व तेलंगणा,आध्रप्रदेश येथुन हजारो भाविकांची उपस्थिती असते. 5 दिवस चालणार्‍या या उरुसा मुळे माहुर शहरा बरोबर परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. काल शहरातुन निघालेल्या संदल मिरवणुकीत संगीताच्या तालावर जिप सदस्य समाधान जाधव,नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,पोनी.राजा टेहरे,नगरसेवक रफिक सौदागर, इलियास बावानी यांनी नृत्य करुन उपस्थित 15 हजार मुस्लिम युवकांची मने जिंकल्याने मिरवणूकीस रंग चढला होता.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमाकांत खरात,पोनी.राजा टेहरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मिरवनुक शांततेत पार पडली.

Related Photos