Breaking news

विवादीत मन्नेरवारलु जात प्रमाणपत्रातील त्रुटी 24 तासात दुरुस्ती करुन घ्या

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे उपविभागीय अधिकार्यांना आदेश!
माहुर(सरफराज दोसाणी)मन्नेरवारलु(आदिवासी) या जातीच्या प्रमाणपत्रावर वाई पंचायत समिती ची निवडणूक जिंकलेल्या मारोती बंडु रेकुलवार यांच्या विरुद्ध अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद विभागाने 20 जानेवारी 2017 रोजी तांत्रिक कारणांसाठी अनुसूचित जमाती चा दाखला रद्द व जप्त करण्यात येत असल्याचा निर्णय दिला होता.या निर्णय या विरुद्ध मारोती रेकुलवार यांनी मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती.यावर आर.व्ही.गंगापुरवाला,के.एल.वाढणे यांच्या द्विय सदस्ययी न्यायालयाने आज दि.9 रोजी ऐतिहासिक निर्णय देत उपविभागीय महसुल अधिकारी किनवट यांना मन्नेरवारलु या जातीच्या प्रमाणपत्रावर 24 तासाच्या आत डब्लु ऐवजी वि ची दुरुस्ती करुन द्यावी असे आदेश दिल्याने मारोती बंडु रेकुलवार यांचा पंचायत समिती सभापती पदासाठी चा मार्ग मोकळा झाला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पस निवडणुकीत तालुक्यातील चार पस च्या गणापैकी अनुसूचित जमाती साठी राखीव असलेल्या ऐकमेव जागेवरुन वाई गणातुन मारोती रेकुलवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडुन निवडणुकीत विजयी झाले होते.त्यांच्या कडे उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट ने
20/3/2013 रोजी दिलेले जातीचे प्रमाणपत्र क्र.2013/cr-162 होते.त्या अधारे त्यांनी जात पडताळणी समिती कडे त्यांनी पडताळणी साठी अर्ज दाखल केला होता.त्या अर्जावर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समीती औरंगाबाद विभागाने 20 जानेवारी रोजी मन्नेरवारलु या जातीच्या दाखल्यात वि च्या ठिकाणी डब्लु असे उल्लेख असल्याने ते जातीचा दाखला तांत्रिक कारणांमुळे रद्द व जप्त करण्याचा निर्णय दिला होता.त्या नंतर तालुक्यासह जिल्ह्य़ातील राजकारण धवळुन निघाले होते.विविध चर्चेला उधाण आले होते.

आज गुरवार नउ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने समिच्या आदेशा विरुद्ध निर्णय देत याचीका कर्ता मारोती बंडु रेकुलवार यांना दिलासा देत उपविभागीय अधिकारी किनवट यांना प्रमाणपत्र 24 तासात दुरुस्ती करुन देण्याचे आदेश दिले.या आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेम्यात जल्लोशाचे वातवरण निर्माण झाले असुन आता दि.14 रोजी सभापती च्या निवडणुकीत रेकुलवार यांना भाग घेता येणार असल्याने त्यांचे सभापती पद निश्चित झाले आहे.याचीका कर्ताची बाजु विधितज्ञ विभुते यांनी बाजु मांडली.

Related Photos