Breaking news

किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हर्षोल्हासात साजरी

किनवट(प्रतिनिधी)इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्र्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..! त्यांच्या तिथीप्रमाणे येणार्‍या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.15) सकाळी नऊ वाजता येथील शिवसेनेच्या वतीने तालूका प्रमुख राम पाटील व शहरप्रमुख संतोष येलचलवार यांच्या नेतृत्वाखाली हर्षोल्हासात शहरातील मुख्य चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमाळा अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी जवळपासच्या खेड्यापाड्यातून शेकडो शिवसैनिक आपल्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी चौकात जमा झाले होते. तालुका संघटक शरद जयस्वाल,व्यंकट भंडारवार,मारोती सुंकरवार,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे,युवासेना तालुकाप्रमुख प्रमोद केंद्रे,शैलेश बेलसरवार,राजेंद्र भातनासे,राकेश गनोजवार,महेश म्याकलवार,पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती गजानन कोल्हे,महेश भंडारे,राजू गनोजवार,प्रशांत कनपत्तीवार,सुरेश लोगमवार,गणेश बुद्रुकवार,अविनाश बल्लेवार,गोवर्धन तक्कलवार,संदीप कोकाटे,विक्की जाधव,अमोल दुधेवार,सूरज कोल्हे,चंद्रकांत सोवदरवार,राजू सिरमवार यांचेसह अनेक शिवसैनिकांनी छत्रपतींना जयंतीनिमित्त पुष्पहार घालून मानवंदना दिली.

‘‘प्रवाहासोबत जाण्याचे नाकारून सतराव्या शतकात अखंड भारत-मुक्तीचे स्वप्न पाहणार्‍या या शिवरायांच्या अजरामर कार्यामुळे जगात त्यांची ओळख आहे.ज्यांची महती गाण्यासाठी कॉस्मे डी गार्डा या पोर्तुगिज लेखकाने 1666 मध्येच छत्रपती शिवरायांचे चरित्र लिहून पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध केले होते. या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सेनाधुरंधराच्या काळात सगळ्या जाती-पातीची माणसे गुण्यागोविंदाने व निर्भयपणे एकत्रित जगत होती.अशी शिवशाही पुन्हा स्थापित करून मानवजातीला सुखी करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावी,असे मत तालुकाप्रमुख राम पाटील यांनी याप्रसंगी बोलतांना व्यक्त केले. शिवजयंतीनिमित्त दि.26 मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने किनवट शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून,या मिरवणूकीत हजारोच्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मिरवणूकीचे आयोजक तथा शहरप्रमुख संतोष येलचलवार यांनी यावेळी केले.

Related Photos