समीतीकडे प्रस्ताव सादर करण्याचा पुरावा नसल्याने माहुरच्या सभापती पदाची निवड रद्द!

उपसभापती पदी निलाबाई राठोड बिनविरोध!
माहुर(प्रतिनिधी)जात वैद्यता पळताळणी समिती कडे प्रस्ताव सादर करण्याचा पुरावा नसल्या कारणाने पंचायत समिती सभापती पदासाठी राकाँचे मारोती बंडु रेकुलवार यांचे एकमेव अर्ज पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांनी रद्द ठरविले.तर उपसभापती पदासाठी काँग्रेस च्या निलाबाई राठोड यांच्या विरुद्ध दुसरे अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

अनुसूचित जमाती चे जात प्रमाणपत्र वैद्यता समिती कडे सादर करण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.09 मार्च रोजी दिलेल्या निर्णयानुसार सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करतांना जात वैद्यता प्रमाणपत्राचे पुरावा जोडने बंधनकारक होते.परंतु सलग तिन दिवस सुट्टी आल्याने व आज दि.14 (मंगळवार) ला सभापतीची निवड असल्याने अनुसूचित जमाती चे राष्ट्रवादी काँग्रेसचे पस सदस्य मारोती रेकुलवार यांना एकाच दिवशी एकाच वेळी जात पडताळणी समीती औरंगाबाद व तहसील कार्यालयात सभापती निवडीच्या ठिकाणी उपस्थित राहने अक्षक्य होते. परीनामी रेकुलवार यांनी निवडणूक आयोगाने सभापती निवडीसाठी घोषीत केलेल्या कार्यक्रमा नुसार सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. आपल्या नामनिर्देशन पत्रासह त्यांनी शपतपत्र व जातीचे प्रमाणात जोडले व जात वैद्यतेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्याचे सांगीतले. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर,गट विकास अधिकारी यु.डी.मंडाळे यांनी दुपारी दोन वाजता निवड जाहीर करण्याच्या वेळेवर सभापती पदाचे अर्ज हे जात पडताळणी समिती कडे प्रस्ताव सादर करण्याचा पुरावा नसल्याच्या कारणाने रद्द ठरविले. त्यामुळे सभापती पदाची निवड होउ शकली नाही.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या पुढिल आदेशा पर्यंत सभापती पद हे रिक्त राहणार असल्याचे तहसीलदार वरनगावकर यांनी सांगितले.तर उपसभापती पदाची माळ निलाबाई राठोड यांच्या गळ्यात पडली आहे.

Related Photos