विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकान संघटनेचे धरणे आंदोलन

किनवट (प्रतिनिधी) विविध मागण्यांसाठी शुक्रवारी ( दि. 17 ) स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत धान्याची द्वार वितरण योजना लागू करण्यात यावी, ईपीडीस डाटा क्लियर झालेला नाही; तो डाटा क्लियर करूनच धान्य वाटप करण्यासाठी ई-पोस मशिनची सक्ती करण्यात यावी, तामिळनाडू राज्याप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करून रास्तभाव दुकानदारांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे व मासिक 35 हजार रुपये मानधन देण्यात यावे, धान्य वाटपासाठी असलेली ई-पोस मशिन चालविण्याचे एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व नंतरच मशिन चालविण्याची सक्ती करण्यात यावी,तसेच नजरचुकीने रास्त भाव दुकानदारांकडून मशिनचे बटन दाबल्या गेल्यास त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये, या मागण्यांसह अन्य कांही मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदार महमंद अजिमोद्दीन यांना संघटनेचे प्रतिनिधी मंडळ भेटून निवेदन सादर केले. धरणे आंदोलनात संजय डोंगरे,जावेदभाई,शिवाजीराव पाटील,अशोक राऊत, प्रविण आयलेनीवार,राजलिंग चटने,माधव शेंद्रे,अशोक खंदारे,मिलिंद सर्पे,रामलु तिरनगरवार,दत्तराम राठोड,स्वामी तिरनगरवार यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.

Related Photos