शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन शांततेत! तहसीलदारांनी स्विकारले निवेदन!

माहुर(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी शिवसेने कडुन तालुका संघटक सुदर्शन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि.17 रोजी तिन तास माहुर शहरातील टि पाईंट रस्त्यावर सकाळी अकरा ते एक वाजे पर्यंत चक्का जाम अंदोलन करण्यात आले.जाय मौक्यावर जाउन तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांनी निवेदन स्विकाराले.व अंदोलन शांततेत पार पडले.

तालुक्यासह संपुर्ण राज्य भर सतत तिन वर्षापासून सतत कधी अवर्षन तर कधी अतिवृष्टी मुळे झालेल्या नापिकी ने शेतकरी पुर्णता नागवेला गेला असुन आर्थिक दृष्ट्या खंगला असल्याने शेतकरी मानसीक दृष्ट्या खचला आहे.तेव्हा अशा गंभीर परीस्थिती तुन शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे कर्ज माफ करणे आवश्यक आहे.राष्ट्रीयकृत बँका,नागरी बँका, तालुक्यातील सर्व मल्टिस्टेट पतसंस्था आदी वित्त संस्थांचे कर्ज माफ करून शेतकार्‍यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.या वेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाच्या धोरणा विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी सुदर्शन नाईक,विनायकराव देशमुख,जितु चोले,सोनु चारभाई, हिरासिंग चव्हाण,अरविन्द पवार, अभिषेक जैस्वाल,संतोष चव्हाण, सचिन राठोड,अरविंद दवने,किशोर जाधव,आस्तिक जाधव,गणेश पुरी,अभिषेक दुबे,वैभव लाड यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होती.यावेळी पोलीस कर्मचारी विक्रम राठोड,प्रभाकर करडेवाड,जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Photos