Breaking news

नगरसेवकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महिलांचे लाक्षणिक उपोषण

किनवट(प्रतिनिधी)उपाध्यक्ष व नगरसेवकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रविवारी (दि.19) अनेक महिला सामुहीक लाक्षणिक उपोषणाला बसल्या आहेत. उपोषणकर्त्यांचा आज पाचवा दिवस असल्याने उपोषणाला शहरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे.

नगर परिषदेच्या वतीने शहरात नुकतेच करण्यात आलेले दोन सिमेंटचे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. हे रस्ते पुन्हा खोदून दर्जेदार करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसह अन्य चार मागण्यांसाठी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अभय महाजन, नगरसेवक कृष्णा नेम्मानीवार व नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार हे तिघेजण बुधवारपासून (दि.15) आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (दि.17) सर्व पक्षीय आवाहनानुसार शहरवासीयांनी शहर कडकडीत बंद ठेवले होते.

वादग्रस्त नगर परिषद प्रशासन उपोषणाच्या पाचव्या दिवशीही उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्याने आज रविवारी (दि.19) पंचवीसच्या वर महिला लाक्षणिक उपोषणाला बसल्या आहेत. यात महिला कॉंग्रेस कमेटीच्या तालुकाध्यक्षा सुरेखाताई काळे, माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका इंदुताई कनाके, नगरसेविका करूणा आळणे, नगरसेविका अंजली दोनपेल्लीवार, नगरसेविका अनाफा बेगम शेख अली, नगरसेविका शबाना बडगुजर, जयश्री भरणे यांच्यासह अनेकजणींचा समावेश आहे.

Related Photos