BREAKING NEWS

logo

नांदेड, महाराष्ट्र शासनाचा 4 कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या निमित्ताने गोळेगाव येथे नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी जि.प.चे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे, लोहा पं.स.चे माजी सभापती सुभाष गायकवाड, पं.स. सदस्य संजय पाटील ढेपे, बाबाराव पाटील हाळदेकर, अशोक पा.मारतळेकर, माधव मंगनाळे, तिरूपती पा.कपाळे, बंजारा क्रांतीसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पवार यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवाजी कपाळे यांनी व गावकऱ्यांच्या वतीने घडवून आणला. यावेळी बोलताना शिवाजी कपाळे म्हणाले की, प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी झाडे लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी गावातील सरपंच प्रभाकर पा.ढाले, माजी सरपंच कोंडिबा पा.ढाले, तंटामुक्ती अध्यक्ष माधव पा.लादगे, ज्येष्ठ नागरिक रावसाहेब ढाले, सतीश ढाले, उत्तम गुरूजी कपाळे, विश्वंभर ढाले, शंकर सिरसाठ, बाबुराव कपाळे आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती. 

    Tags