BREAKING NEWS

logo

नांदेड, सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक / अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी संवर्गातून भरण्यात येणार आहेत. 

चौकीदार (एक पद)- पात्रता माजी सैनिक, स्वयंपाकी (तीन पदे)- किमान एक वर्ष अनुभव, सफाई कामगार (एक पद)- किमान एक वर्ष अनुभव, सहा. वसतीगृह अधिक्षक (एक पद) या पदासाठी माजी सैनिक (एन.सी.ओ.) / अवलंबित किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी 02462-245510 व 9689677217 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
सैनिकी मुलांचे वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत विष्णुपुरी येथील सैनिकी मुलांचे वसतीगृहात अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त माजी सैनिक, विधवा व इतर नागरिकांच्या पाल्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.  जिल्हयातील माजी सैनिक / विधवांनी याचा लाभ घ्यावा. प्रवेश अर्ज वसतीगृह विष्णुपुरी येथे विक्रीस उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी 02462-245510 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कप्तान सुनील गोडबोले यांनी केले आहे.  

महाविद्यालय, शाळांनी विद्यार्थ्यांची  परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत 
नांदेड, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शाळांनी जुलै-ऑगस्ट 2017 च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने लॉगीनमधून डाऊनलोड करुन घ्यावीत. नेहमीच्या पद्धतीने छापील प्रवेशपत्र दिली जाणार नाहीत. तसेच सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र स्वाक्षरी व शिक्यानिशी विद्यार्थ्यांना हस्तांतरीत करावीत, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव यांच्यावतीने लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याची कार्यवाही जवळपास पूर्ण झाली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

    Tags