BREAKING NEWS

logo

लोहा, दिवसेंदिवस पर्यावरणात बदल होत आहे.दुष्‍काळाचे संकटाला सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतूलन टिकविणे आवश्यक आहे.  कायमची पाणी टंचाई, पर्यावरनाचा असमतोल होऊ नये यासाठी  वृक्ष लागवड करून ती जपणे काळाची गरज आहे. रिसनगाव येते निसर्ग पर्यटन व्हावे यासाठी चार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे असे प्रतिपादन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनीकेले

लोहा तालुक्यातील रिसनगाव  येथे वनविभागाच्‍या वतीने आयोजितकेलेल्‍या वन क्षेत्रात वृक्ष लागवड आ प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सहायक वनसंरक्षक ,डी एस पवार, वनपरिक्षेत्र अधिकरी आर एल पाटील, पं स सभापती  सतिश पाटील उमरेकर जि.प. सदस्‍य चंद्रशेख पाटील गौंडगावकर ,शिवसेना उप जिल्‍हा प्रमुख शरद पाटील पवार ,माजी नगराध्‍यक्ष किरण वट्टमवार, माजी सभापती केशव पाटील बाबर  कंधार तालुकाप्रमुख भगवान राठोड, प.स.सदस्‍य दत्‍ता वाले, केशव तिडके, व्‍यंकटराव गव्‍हाणे, बाळू पाटील बाबर, युवा सेनेचे प्रमुख  परमेश्‍वर मुरकूटे, ,अर्जुन राठोड, वनपाल टी ए देवकते, वनरक्षक गजानन कोटलवार, एस डी हगदळे,एस खलसे, एल यू जायभाये,  भानुदास बाबर,सरपंच संजय नाईक, वैजनाथ पवार आदी मान्‍यवर उपस्‍थीत होते. यावेळी बोलताना आ. प्रताप पाटील म्‍हणाले की, गत अनेक वर्षापासून राज्‍यात दरवर्षी झाडे लावा झाडे जगवाअशी योजना अंमलात आणल्‍या जाते. खड्डा तोच झाडे वेगळीअशी परिस्‍थीती निर्माण होताना दिसते. दुष्‍काळ परिस्थिती पाहता झाडे लावल्‍या शिवाय पर्याय नाही हा उद्देश समोर ठेवून राज्‍यातील सेना भाजपा सरकारने राज्‍यात ४ कोटी वृक्ष लागवड केली जात आहे. गत वर्षी याच भागात २७ हजार वृक्ष लागवड करण्‍यात आली होती. वन विभागाच्‍या कर्मचा-यांनी योग्‍यजोपासणा केल्‍याने ९० टक्‍के वृक्ष जिवंत आहेत ही बाब कौतुकास्‍पद आहे या भागातवृक्ष लागवड करून हरीतक्रांती घडवून आणण्‍यासाठी ५ कोटी रूपयाचा विकास आराखडा तयार करण्‍यात आला आहे. तो लवकरच मंजूर होईल. 

माहूर किनवट भागात वृक्ष जास्‍त असल्‍याने त्‍या भागात पाऊस अधिक होऊन पुरयेत आहे तर आपल्‍या भागात दुबार पेरणीचे संकट उभे राहत आहे. हे संकट कायमचे नष्‍ट करण्‍यासाठी मतदार संघातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीने एक झाड लावून त्‍याला जगवणे ही काळाची गरज असल्‍याचे आ. प्रताप पाटील म्‍हणाले मुंबईच्‍या धर्तीवर प्रत्‍येक ग्रामपंचायतीने झाडे लावून ती जगविली पाहीजे असा कायदाच करायला हवा. या भागातील धोंड प्रकल्‍याचे काम मार्गी लावण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधी उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती केली आहे. दळणवळणाची व्‍यवस्‍था करून कायमचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या भागात वन पर्यटन साठी चार कोटी चा आराखडा करण्यात आला आहे असे आ  प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. या कार्यकर्माचे प्रस्ताविकात सहाय्यक वन संरक्षक डी एस पवार यांनी माहिती दिली. सेवानिवृत्त वन विभागाचे उप संचालक गोविंद बिडवई यांच्या कार्यकाळात  पर्यटन विकास आराखडा तयार झाला त्यासाठी आ प्रतापराव पाटील यांनी या भागात विकासा साठीचा  प्रयत्न केला होता.

    Tags