BREAKING NEWS

logo

लोहा, पुरवठा विभागात तशा नेहमीच तक्रारी असतात.परंतु या तक्रारीच्‍या चौकशीच्‍या फे-यातुनही चांगले काम होत असते पण त्‍याची फारसी चर्चा होत नसते. कदाचित तशी दृष्‍टीची  'तोलाई 'नसावी. लोहयाचा पुरवठा विभाग तसा सतत चर्चेचा.... पण याच विभागात अव्‍वल कारकुन असलेले श्री जी.एल मोहीजे यांनी केलेल्‍या कामगिरी चे  जिल्हा   पूरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी तोंड भरून कौतुक केले आणि जिल्‍हा आढावा बैठक श्री मोहीजे यांच्‍या पाठीवर शाब्‍बासकीची थाप मारली......

जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी 'नाहीरे वाल्‍यांच्‍या' आधार  दिली. त्‍यामुळे दारोदार जाउन अन्‍न मागणा-या या भटक्‍यांना वर्षानुवर्षाच्‍या प्रतिक्षेनंतर ‘स्‍वस्‍त धान्‍य’ व राशन  कार्ड मिळाले. लोहा पुरवठा विभागात आधार जोडणी जिल्‍हयात सर्वात मागे  परंतु पुरवठा विभागाचे अव्‍वल कारकुन  जी.एल. मोहीजे यांनी रात्रन दिवस परिश्रम घेत उदिष्‍ट पुर्ती केली यात उपलब्‍ध अपु-या मनुष्‍यबळ वा साधन सामुग्री विषयी कधीच तक्रार केली नाही हे विशेष. या कामाची स्‍वत: जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी दखल घेतली व त्‍यांचा सत्‍कार केला पाठीवर शाब्‍बासकीची थाप मारली. याबदल तहसिलदार डॉ आशिषकुमार बिरादार, पुरवठा नायब तहसिलदार श्री जायेभाये , गोदाम प्रमुख सी.पी. धर्मेकर, धोंडगे सतीश, पेशकार पी.पी.बडवणे, सौ. सुरूंगवाड, सॉ. वाळुजकर, सौ वाहुळे, टोपारे, जी.के. पटणे, गायकवाड, मेजर शिंदे, टी.के. मुंगरे , वाघमारे, यासह मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.

    Tags