logo

नांदेड, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. अगोदरच शेतकरी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातच उगवलेले पिके पाण्याअभावी करपून जात असल्याने लिंबोटी धरण लाभक्षेत्रातील पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस दिलीप धोंडगे यांनी केली आहे.

कंधार-लोहा तालुक्यातील लिंबोटी धरण क्षेत्रातील 20 गावांना लिंबोटी धरणातील पाणी पिकांसाठी सोडण्यात यावे, सध्या धरणामध्ये 40 टक्के पाणीसाठा असून यातील पाणी हळद, कापूस, ज्वारी, ऊस, सोयाबीन आदी पिकांसाठी सोडण्यात यावे सध्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतातील पिके करपून जात आहेत, या पिकांना जीवदान देण्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजी जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जि.प. माजी सभापती संजय पा. कऱ्हाळे जीवनराव वडजे, सचिन मुंडे, तुकाराम वडजे, नारायण ताटे, किसन ताटे, माधव ताटे, भीमराव कदम, शिवप्रसाद नेटनाळे, प्रशांत भुजबळ यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.

    Tags