logo

लोहा, पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांच्या बदल्या प्रशासनात सूसूत्रता यावी व लोकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेऊन केली जाते त्यामुळे या बदल्यात कोणत्याही कर्मचार्‍यांचा अवाजवी हस्तक्षेपाची गांभिर्याने दखल घेतली जाईल असा सज्जड इशारा सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी दिला. 

लोहा पंचायत समितीच्या ग्रामसेवकांच्या तालुकांतर्गत बदल्यात झालेला गोंधळ पाहता या सदर्ंभात सभापती सतीश पाटील उमरेकर, उपसभापती इंदूताई बालाजी पाटील, यांनी बीडीओ यांच्याशी चर्चा केली व सुसूत्रता आणा सोयीप्रमाणे बदल्या न करता लोकांचा विचार करून निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. त्यामुळे या बदलीत आपल्या सायीप्रमाणे जवळचे-दूरचे असा भेद करणार्‍या विस्तार अधिकार्‍यांना पं.स. पदाधिकारी यांनी चांगलेच फैलावर घेतले. ग्रामसेवकांना गाव देताना दोन गावात खूप अंतर (जसे हाडोळी-हळदव असे दूरचे गाव) असे नियुक्त आदेश काढले जात होते. पं.स.सदस्य नरेंद्र गायकवाड आणि सहकार्यांनी काही विस्तार अधिकार्‍यांच्या मनमानीला चांगलेच फैलावर घेतले.
 
संपूर्ण घटनाक्रम सभापती सतीश पाटील -उपसभापती बालाजी पाटील  यांच्या लक्षात आणून देताच संबंधीतांना घाम फुटला. एका कर्मचार्‍यांची प्रशासनातील लुडबुड पाहता सभापती सतीश पाटील उमरेकर चांगलेच संतापले. अवास्तव वाढता हस्तक्षेप आणि ज्या गावात याची ड्युटी आहे तेथे ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असतात अशी चर्चा झाली शिवाय सदस्य-पदाधिकारी यांच्यात वाद लावण्याचे उद्योग केले जात होते . हे पाहून असा हस्तक्षेप सहन न करता शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही अशी रोखठोक भूमिका सभापती व काही कार्यतत्पर सदस्यांनी घेतली. हा प्रश्न मासीक बैठकीत गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    Tags