logo

लोहा (एनएनएल) तालुक्‍यातील येळी ,अंतेश्‍वर, भारसवाडा,डोणवाडा, पेनुर या गोदाकाठच्‍या गावात अनाधिकृत रेतीसाठी आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्‍या मार्फत तहसिलदार डॉ.आशिषकुमार बिराजदार यांनी पंचनामे केले.  ७ हजार ९00 ब्रास  वाळु जप्‍त करण्‍यात आली. अंदाजित एक कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीच्या  वाळुचा लिलाव सोमवारी लोहा तहसिल कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.शिवाय बारा क्रेशर मशीनला सील ठोकण्यात आले. तहसीलदार यांनी नमनालाच वाळु साठवणुकदाराणाच दणका दिला आहे. त्‍यामुळे अवैघ रेतीसाठा करणा-याचे धाबे दणादणले.

लोहा तालुक्‍यातील गोदाकाठच्‍या डोणवाडा,येळी,अंतेश्‍वर,भारसवाडा,पेनुर या भागात मोठया प्रमाणात अवैध रेती साठे करण्‍यात आले आहेत. तहसिलदार पदाची सुत्रे हाती घेतल्‍यानंतर डॉ.आशिषकुमार बिराजदार यांनी रेती साठवणुकीचे तलाठी ,मंडळ अधिकारी यांच्या मार्फत  पंचनामे  करण्यात आले होते त्यानंतर हि जप्‍तीची कार्यवाही झाली आहे.. गाव निहाय रेतीसाठा (कंसात ब्रासमध्‍ये) डोणवाडा गायराण (६हजार) येळी (४८0), अंतेश्‍वर(५८) अंतेश्‍वर (११९) अंतेश्‍वर (१२२) अंतेश्‍वर (२३९) ,अंतेश्‍वर (९६) अंतेश्‍वर (३२५),भारसवाडा (२२०)पेनुर गायरान (३००) अशी एकुण ७हजार नऊशे ५९ ब्रास रेती जप्‍त करण्‍यात आली. सोमवारी १७ जुलै रोजी लोहा तहसिल कार्यालयात सकाळी ११ वाजता या जप्‍त केलेल्‍या रेतीचा जाहीर लिलाव होणार आहे. किमान बाराशे शहात्‍तर रुपये प्रती ब्रास इतकी रेती साठयाची हातची किंमत राहणार आहे. ५ हजार रुपये अनामत रक्‍कम भरुन लिलावात भाग घेता येणार आहे. लिलाव आणखीन झाल्‍यावर २५टक्‍के रक्‍कम त्‍याच दिवशी व उर्वरित रक्‍कम २दिवसात भरणा करणे गरजेचे आहे. लिलावाच्‍या अटी व शर्तीच्‍या आधीन राहुन लिलाव होणार आहे. तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिराजदार यांनी 'नमना'लाच रेतीची अवैध साठवणूक करणा-यांना जप्‍तीचे 'इंजेक्‍शन 'दिले .या कार्यवाहीमुळे रेती वाहतुक व साठवणूक करणा-याचे धाबे दणादणले आहे.
         
क्रेशरला सील
लोहा तालुक्यातील पाच गिट्टी क्रेशर मशीन चालकांनी परवाना नूतनीकरण केले एक प्रक्रियेत आहे. बारा जण आद्यप नूतनीकरण प्रक्रियेत नाहीत त्यामुळे मुद्दत संपलेल्या व निर्धारित वेळेत परवाना नूतनीकरण न केलेल्या बारा क्रेशरला तहसीलदार डॉ बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार देवराय, अव्वल कारकूनल सौ वाळूजकार व कर्मचाऱ्याच्या पथकानी सील ठोकले आहे. तहसीलदार बिराजदार यांची 'धडाकेबाज' इन्ट्रीने वाळुवाल्यांची 'दे -दणादण 'उडविली आहे.

    Tags