BREAKING NEWS

logo

माळाकोळी (एनएनएल) मी लोकांना काय पटते ते करणारा राजकीय कार्यकर्ता आहे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी व जनतेची कामे करण्यासाठी जे करावे लागेल तसा निर्णय घेतला तर त्यात वावगे नकाय?  पक्ष कोणता हा प्रश्न पेक्षाही  मतदारसंघाचा विकास व मतदारसंघातील लोकांची कामे होणे महत्वाचे आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ईतर मतदारसंघापेक्षा जास्तीचा निधी माझ्या मतदारसंघाला दिला आहे  असे  प्रतिपादन  प्रताप  पाटील चिखलीकर यांनी केले.
   
माळाकोळी येथे संतोष तिडके यांच्या संपर्क कार्यलयाच्या उदघाटन आ प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ज्येष्ट नेते बाबुराव केंद्रे उमरगेकर होते.प्रमुख अतिथी म्हणून जि प सदस्य प्रतिनिधी  हंसराज पाटील बोरगावकर, लोहा प.स.सभापती सतिश पाटील उमरेकर, शिवसेना जिल्हा उप प्रमुख.शरद पवार, लोहा शहर प्रमुख छत्रपती धुतमल  युवा सेना प्रमुख परमेश्वर मुरकुटे, कंधार शिवसेना प्रमुख भागवान राठोड, प.स.सदस्य नरेंद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, संचालक बालाजी पाटील  कदम, छत्रपती धुतमल, गोपाळ तिडके, सुभाष भालेरावकृष्णा केंद्रे, अादी मान्यवर उपस्थित होते. आ प्रताप पाटील म्हणाले की भाजपा त जाणार अशी चर्चा सध्या लोहा व कंधार तालूक्यात   जोर धरत आहे त्या मुळे विरोधकांची झोप उडाली आहे  कोणताही पक्ष त्या कार्यकर्त्याची क्षमता पाहुनच जवळ करत असतो त्यामुळे विरोधकांनी बेचैन होण्यापेक्षा काम करुन आपली क्षमता सिद्ध करावी, मी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढवली. जनतेच्या व स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या आशिर्वादाने भरघोष मतानी निवडुन आलो त्यामुळे माझ्यासाठी पक्ष महत्वाचा नसुन, मतदार संघाचा विकास व जनतेची कामे होणे अंतत्य गरजेचे आहे. मुख्यमंत्री  देंवेद्र फडणविस यांच्याशी माझे अतिशय चांगले संबध असुन त्यांनी मला ईतर मतदारसंघा पेक्षा अडीच पट जास्त निधी दिला असल्याचे आ.चिखलीकर म्हणाले.

त्यांनी माळाकोळी येथील शिल्पकारांचा गौरवही केला ते म्हणाले माळाकोळीमुळे माझ्या मतदारसंघाचे नाव देशभर झाले येथील शिल्पकला देशात पोहचली आहे याचा मला लोकप्रतिनिधी म्हणुन अभिमान आहे, माळाकोळीच्या अंतर्गत रस्त्यासाठी निधी लवकरच दिला जाईल असे ते म्हणाले. संपर्क कार्यालयातुन जनतेची कामे मार्गी लागली पाहीजेत अश्या सुचना त्यांनी संतोष नाना यांना केली कधी चौकार. कधी षटकार तर कधी गुगली टाकत त्यांनी राजकीय चर्चेला विराम न देता उत्सुकता कायम ठेवली हसंराज पाटील यांनी खास शैलीत विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सुत्रसंचलन सरपंच जालींदर महाराज कागणे यांनी केले या वेळी हंसराज पाटील व बाबुराव केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भा.ज.पा. नेते कृष्णा केंद्रे यांची भा.ज.पा.युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय मामा चाटे, संजृय गुट्टे, अर्जुन राठोड, गणपत तिडके प्रविण तिडके, बंडु नागरगोजे, माधव गायकवाड, दिपक कागणे, गोविंद चाटे, केशव मस्के यांचे सह गावातील बहुसंख्य  नागरीक ऊपस्थित होते.

माजी आ गोविंद केंद्रे यांची अनुपस्थीती 
आमदार प्रताप पाटील चिखलीकर व माजी आ गोविंद केंद्रे एकाच व्यासपीठावर येणार यासंदर्भात मागील काही दिवसांपासुन होत असलेल्या चर्चांना यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ गोविंद केंद्रे यांच्या अनुपस्थीतीमुळे होणाऱ्या चर्चेला पुष्टी मिळाली  नाही राजकीय आपेक्ष भंग झाला मिळाला. माजी आमदार गोविंद केंद्रे यांना काही अडचणिंमुळे कार्यक्रमास उपस्थीत राहता आले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले,.सोहळ्याला ग्रामस्थचीखूप गर्दी होती

    Tags