logo

लोहा (एनएनएल) श्री संत गाडगे महाराज महाविदयालय  वाणिज्‍य विभागात जीएसटी वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . नूतन प्रवेश बीकॉम विध्यार्थी स्वागत आणि परिचय सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्राचार्य डॉ अशोक गवते पाटील यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कार्यक्रमात जीएसटी वर व्याख्यान झाले.विभाग प्रमुख डॉ प्रा. डी एम पवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. बी कॉम प्रथम वर्ष विदयार्थी स्वागत व परिचय  नंतर  विदयार्थी वाणिज्‍य मंडळाची स्‍थापना करण्‍यातआली .मंडळ अध्‍यक्ष  राहुल स्‍वामी, उपाध्‍यक्ष शहाजी मोरे सचीव अजय पवार सदस्‍य कु. शिल्‍पा बल्‍लोर, कु. शितल एकलारे, कु. अनुसया मोगरे शिवलींग नागसाखरे, केतन कोटलवार अशी निवड करण्‍यात आली. जी एस टी.विषयावर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रा एन एन मुंडे यांचे व्‍याख्‍यान झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्ष स्‍थानी प्राचार्य डॉ अशोक गवते पाटील होते. महाविद्यालय स्थानिक व्यस्थापन समितीचे अध्यक्ष व्‍ही. जी. चव्‍हाण याची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ अशेाकराव गवते डॉ मुंडे व व्‍ही जी. चव्‍हाण  विदयार्थ्‍याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक  वाणिज्य विभाग प्रमुख डॉ डि एम पवार  यांनी  विध्यार्थ्यांना या विद्या शाखेचे महत्त्व आणि रोजगार संधी किती आहे त्यासाठी अभ्यास करावा निवड योगे ठरावी असे मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन प्रा राजेश रोकडे यांनी तर आभार प्रा गीरे यानीकेले कार्यक्रमास वाणिज्‍य शाखेच्‍या   प्रा चालीकवार, प्रा चव्‍हाण प्रा. काबंळे  विध्यार्थी उपस्‍थीत होते.

    Tags