logo

BREAKING NEWS

राज्यस्तरीय स्वच्छता पथकाकडून लोहा शहराची पाहणी

जून अखेर हगणदारीमुक्त

लोहा, गेल्या महिनाभर पासून नगराध्यक्षा व प्रशासनाने स्वच्छ शहरासाठी घेतलेली मेहनत आजच्या राज्य्सातारीय पाहणी पथकाच्या दौऱ्यात फुल्रुपला आली. पाच वेगवेगळ्या उघड्या भागात एकही व्यक्ती शौचास गेलेला आढळला नाही. साडे पंधराशे शौचालयाची कामे पहिली स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत प्रभावी काम पाहता ‘चांगले काम’ असा शेरा राज्यस्तरीय पथकांनी दिली. आणि पदाधिकारी-प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत  राज्यस्तरीय टीम ने आज सकाळी सहा वाजल्या पासून शहरातील पाच वेगवेगळ्या भागाची पाहणी केली. बुलढाणा जिल्हा प्रकल्प अधिकारी उदय कुर्वेकर, नांदेड मनपाचे सहाय्यक आयुक्त गुलाब मोह्हमद सादेक, दै. शिवविचार वाशीम चे संपादक अनिल गाडेकर, यांच्या पथकांनी पाहणी केली. माजी आ. रोहिदास चव्हाण यांनी आठ दिवस रोज प्रहरी लोकांना जागृती केली. तहसीलदार उषाकिरण शृंगारे, नगराध्यक्षा आशाताई चव्हाण, उपनगराध्यक्ष सोनू संगेवार व पालिका कर्मचार्यांनी जनजागृती केली त्याचे मूर्तरूप आज तपासणी निमित्त पाहायला मिळाले. प्रभारी मुख्याधिकारी जाधववर , माजी आ. रोहिदास चव्हाण, नगराध्यक्षा आशाताई चव्हाण, उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, उपस्थित होते. विभाग प्रमुख चंद्रकांत भदाडे, पालिका अधिक्षक बाबुराव केंद्रे, माधव पवार, पाणी पुरवठा अभियंता विजय चव्हाण, शहर भियांता नितीन चव्हाण, उल्हास राठोड, बळीराम पवार, किसन दांगटे, भातलवंडे, संतोष कानोडे, गवळेबाई, राजू दळवे, शंकर वाघमारे, शंकर राठोड, सोमनाथ केंद्रे, रावसाहेब नळगे, निळकंठ निर्मले, नंदकुमार अंकले, बालाजी फरकंडे, प्रकाश मोरे यासह कर्मचारी-सफाई कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. पथकांनी पाचही ठिकाणे पाहून समाधान व्यक्त केले. कर्मचार्यांनी भल्या पहाटे पासून घेतलेली मेहनत आजच्या पाहणी दौऱ्यात फलश्रुतिला आली.

लोहा शहर व  परिसरात बेमोसमी पाऊस; विद्धुत खंडित
लोहा व परिसरात आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बेमोसमी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. विद्धुत तर तुटल्या त्यामुळे विद्दुत पुरवठा खंडित झाला. बेमोसमी पाऊसानंतर वातावरनात उकाडा वाढला. विद्धुत पुरवठा खंडित त्यामुळे ‘अधिक’ उकाड्याला सामोरे जावे लागले.

    Tags