logo

BREAKING NEWS

हातवारे - हावभाव - भावमुद्रेतील मूक बाधिरांचे आयुष्य बोलक्यासाठी अंतर्मुख

लोहा, बोलक्‍यांच्‍या भाषेत कधी ताठरपणा कधी मृदुत्‍वा असते. जीवनाच्‍या वाईटपणाला बोलणे कारणीभुत ठरते तसेच चांगुलपणाही. त्यातून समोर येतो. ज्यांच्या नशीबी मुक-बधिर आली, त्यांच्या जीवनचाचा गाडा हातवार-े हावभाव -भावमुद्रेवरच असतो. जीवनाची साथ सोबत  मुक्याची असते तेव्हा हावभावाच्‍या रेषमगाठी घट्ट बांधल्या तर त्‍यांचा संसार आपल्‍या सारख्‍या बोलक्‍यांच्‍या रोजच्‍या कटीकटीला कडाक्या च्या भांडणाला आत्‍मचिंतन करायला लावणारा असतो. जात- धर्म -गण -गोता पलीकडे जाऊन हे मुकबधीर 'आपलेपणा- आस्‍थेवाईकता' आणि माणुसकी जोपासतात. असाच एक मुकबाधिरांचा अविस्मरणीय मंगल सोहळा विष्णुपुरीत  अनुभवता आला

विष्‍णुपूरी येथे सिद्धार्थ हटकर यांच्या परिवारात सौ. करुणा व देविदास हाटकर या दाम्‍पल्‍याला चार लेकरे. पैकी दोन मुले व एक मुलगी मुकबधीर. थोरला मुलगा प्रताप कृषी विद्यापीठात वरिष्‍ठ लिपीक तो आणि त्‍यांची पत्‍नी सुप्रिया दोघेही मुकबधीर. पण त्यांची दोन मुले बोलकी आहेत. त्‍याच्‍या नंतरचा जयवंत हा बांधकाम विभागात लिपीक तो ही मुकबधीर पण त्‍याची पत्‍नी श्रद्धा बोलकी. मोठया मुलाची  बोलकी  मुक्‍या आई वडिलांना बोलताना त्याच्या भाषेत म्हणजे हातवारे -हावभाव करुन बोलतात. आजी, आजोबा, काका शिलानंद यांच्‍याशी बोलका संवाद साधतात.जन्मताच या परिस्थितीशी त्या लेकरांची जुळवून घेतले 

मुकबधीर अलका हीचा विवाह भुनाजी धबाले (भारसवाडा ता. परभणी )यांचा मुलगा संजय यांच्‍याशी पार पडला. दोघेही मुकबधीर यांच्‍या विवाहासाठी किमान ५० हुन अधिक मुकबधीर आले होते. त्‍यात जवळपास 25-30  जोडप्‍यांचा संमावेश होता.बहुतांशी मूक बधीर होते. जातिच्या धर्माच्‍या नात्‍यां गोत्‍याच्‍या पल्‍याड जाऊन ही मुक बधीर माणुसकीची नाते जपतात.सौ करुणा व देविदास हाटकर यांच्‍या मुकबधीर  मुलीचा विवाह मुकबधीर नवरदेव संजय यांच्‍याशी झाला त्‍या  दाम्‍पत्‍यांना आशीर्वाद देण्‍यासाठी परभणी सेलू नांदेड जालना व इतर भागातून सुदाम वैद्य, कैलास रावणगावे, सुधीर बजाज, विनोद राठोड, महेश पतंगे, चंद्रकांत बाफने, श्रीधर रेड्डी, रमाकांत गजभारे, दिपक जाधव, सुरेश गुंडे, प्रदिप रावते, संजय रिंगे, विनय पाटील, साईनाथ कदम अशी मुकबधीर मित्र परिवार व मुकबधीर दाम्‍पत हजर होते. प्रताप हाटकर व जयवंत हाटकर या मुकबधीर बंधूनी मराठवाड्यातील आपल्या मुक्या  मित्रांना बहिणीच्‍या लग्‍नात आवर्जुन बोलविले होते.

हाभावांच्‍या -भावमुद्रेच्‍या या जीवनात ही मुकबधीर अपंग दाम्‍पंत्‍य तरुण तरुणी आयुष्‍याला दुष्यने न देता आपल्‍यातील 'टॅलेंटच्‍या' बळावर नौकरी व इतर व्‍यवसायातून स्‍वावलंबी होताना दिसले. संघर्ष आणि जिद्द चिकाटी याच्यात  असते.यांच्‍या मनात कोणतीही आढा किंवा जात -धर्म -गरीब- श्रीमंतीची गुढी नसते .आपण सर्व एक आहोत मुक बधीर आहेत ही भावना त्यांना ही विषमता विसरायाला भाग पाडत असावी. लग्‍नसमारंभा वा त्‍यांच्‍या अन्‍य कौटूंबीक कार्यक्रमात ए‍कत्रित येऊन आनंद साजरा करतात .दुःखात ही सहभागी होतात. हा समभाव बोलक्‍या माणसांना अंतर्मुख करायला लावणारा असतो. बोलता येत नसेल पण मन निर्मल- सहकार्यवृती यांच्‍या ठायी असते. मुकबधीरांच्‍या विवाह सोहळा बोलक्‍यांसाठी खूप काही चिंतन- मनन करायला लावणारा. त्याच्या समस्‍यकडे, त्‍यांच्‍या आई वडीलांच्‍या वेदनेकडे पहायला समाजमनाला प्रशासनाला कुठे वेळ आहे. प्रत्‍येक जण आपल्‍याच आवर्तनात. पण या वर्तुळाबाहेर ही मुकबधीरांच्‍या जीवनाचा संघर्ष आपल्‍या सारख्‍या धडधाकट माणसांना खूप काही सांगणारा असतो. हे मुकबधीरांच्‍या विवाह प्रसंगी उपस्थितांना  अनुभवता आले. हावभावाच्या आयुष्याला मानवतेची साथ असायला हवी.

    Tags