logo

BREAKING NEWS

लोहा तालुक्‍यात मग्रारोहचा नवोपक्रम ५६ कामे ७२२ मजूरांना काम

रेशीम उत्‍पादनाकडे शेतकरी तहसीलदार सौ.उषाकिरण शृंगारे यांची माहिती

लोहा, लोहा तालुक्‍यातील मजूरांना गावातच काम मिळावे यासाठी महाराष्‍ट्र समृध्‍द ग्राम अभियानातर्गत अकरा कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी अजीत थोरबोले यांनी गाव संपर्क नवोपक्रम हाती घेतला. त्‍याची फलश्रूती तालुक्‍यात मग्रारोह योजनेच्‍या कामावर पहायला मळाली तालुक्‍यात नव्‍याने ५६ कामे सरु झाली असून त्‍यावर ७२२ मजूर काम करीत आहेत. जलसंधारणाच्‍या कामांना शेतकरी प्राधान्‍य देत आहेत. शिवाय रेशीम लागवडीकडे शेतकरी वळला आहे त्‍यामूळे शेती पूरक उत्‍पादनामूळे रोजगाराच्‍या संधीउपलब्‍ध होण्‍यास सुरुवात होते आहे याचे समाधान वाटत अशी माहिती तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी दिली.

लोहा तालुक्‍यातील गाव समृध्‍दी साठी उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांनी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक तांत्रिक सहाय्यक यांची बैठक घेवून मग्रोरड मग्रारोह च्‍या कामांना गावात गती देण्‍याचे सांगितले. वेगवेगळया बैठका घेतल्‍या. गावात संपर्क अभियान अधिकारी नियुक्‍त करुन घेतले त्‍याचा परिणाम समोर आला. तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी सांगितले की, गाव समृध्‍द साठी ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी व्‍हावी यासाठी उपविभागीय अधिकारी श्री श्रोरबोले यांच्‍या आदेशानुसार गावोगावी कामे सुरु करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत. बीडीओ प्रभाकर फाजेवाड, तालुका कृषी अधिकारी विश्‍वांबर मंगनाळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आर, बी केंद्रे यांची यंत्रणा मुळे तसेच अन्‍य विभागाची कामे सुरु झाली. पूर्वी पं.स.ची ३३, कृषी विभागाची ३० व यंत्रणेची ०८ अशा ७१ कामांवर ५३५ मजूर काम करत होते. सद्या तालुक्‍यात कृषी विभागाच्‍या १९ कामांवर १४९ मजूर, सामाजिक वनिकरणांच्‍या १५ कामांवर २०६ रेशीम विभागाच्‍या ५६ कामांवर ९२ तपंचायत समितीच्‍या ३७ कामांवर ८१० मजूर असे एकूण १२५६ मजूरकामावर आहेत.

उपविभागीय अधिकारी यांच्‍या नवापक्रमामूळे ७२२ मजूरांची व ५६ कामांची वाट झाली आहे रेशीम कामात झालेली वाढ शेतीपुरक व्‍यवसायाकडे शेतकरी वळला त्‍यामूळे शेतक-यांना आर्थिक स्‍त्रोत वाढला याचा सकारात्‍मक परिणामसमार येईल अशी अपेक्षा तहसीलदार यांनी व्‍यक्‍त केला व तालुक्‍यातील मजूरांना मग्रारोह अंतर्गत नवीन काम व वाढती मजूरांची संख्‍या याची सर्वांच्‍या प्रयत्‍नामूळे फलश्रूती समोर येत असल्‍याचे दिसते ही सकारात्‍मक बाब होय असे तहसीलदार सौ. शृंगारे यांनी सांगितल व आणखी मजूर वाढतील अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

    Tags