logo

लोहा, संजय गांधी निराधार योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचे बँक खाते काढण्‍यासाठी दिनांक 18 व 19 रोजी लोहा तहसिल कार्यालयात विशेष कॅम्‍पचे आयोजन करण्‍यात आले आहे. कॅम्‍पच्‍या पहिल्‍या दिवशी 93 लाभार्थ्‍यांचे बँक खाते उघडण्‍यात आले असून शुक्रवार दिनांक 19 रोजी खाते काढण्‍यात येणार असल्‍याने लाभार्थ्‍यांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष रामभाऊ  चन्नावार, तहसीलदार सौ उषाकिरण श्रुंगारे यांनी केले आहे

संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दपकाळ निवृत्‍ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजनेच्‍या ज्‍या लार्भार्थ्‍यांना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्याना लाभ मिळावा यासाठी आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शना खाली समिती काम करत आहे. अध्यक्ष रामभाऊ  चन्नावार, करीम शेख, पुंडलिक पाटील,ऍड कविता पौळ , हॊसाजी कांबळे व कार्यकर्ते जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्याना उपरोक्त योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्र यत्न करत आहेत. ज्याची बँक खाते उघडण्‍यात आलेले नाहीत, अशा लाभार्थ्‍यांचे खाते उघडण्‍यासाठी दिनांक 18 व 19 मे रोजी लोहा तहसिल कार्यालयात विशेष कॅम्‍पचे आयोजन करण्‍यात आले आहे. कॅम्‍पच्‍या पहिल्‍या दिवशी 93 लाभार्थ्‍यांचे खाते उघडण्‍यात आले. दिनांक 19 रोजी आयोजित कॅम्‍पमध्‍ये लोहा तालुक्‍यातील बँक खाते नसलेल्‍या लाभार्थ्‍यांनी तहसिल कार्यालयात येऊन आयसीआयसीआय बँकेच्‍या प्रतिनिधीकडुन बँक खाते उघडून घ्‍यावे,असे आवाहन  करण्‍यात आले आहे. सदर कॅम्‍प यशस्‍वी करण्‍यासाठी संगांयो शाखेचे अव्‍वल कारकून पी.पी.बडवणे, लिपिक सतिश धोंडगे, आय टि असिस्‍टंट संगमेश्‍वर टोपारे आदि  परिश्रम घेत आहेत.   

    Tags