BREAKING NEWS

logo

लोहा, राजकारणात कौटूंबिक संबंध दीर्घकाळ स्‍नेहाचे राहतील याची साशंकता असते. अनेक कुटूंबात' "दुरावा 'वैरत्‍व आणि विरोधातून जवळीकता अशी कौटूंबिक राजकीय घडामोड होते. नांदेड जिल्‍ह्याच्‍या राजकारणात श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्‍हाण यांच्‍या सोबत असलेले कुटूंबीय आज त्‍यांच्‍या दुस-या पिढीत सोबत नाहीत  विरोधात आहेत. या कौटूंबिक नातेसंबंधाचा 'भुतकाळ 'भविष्‍याच्‍या राजकीय विरोधाची धार कमी करणारा ठरू शकतो(? ) स्‍व. गोविंदराव पाटील चिखलीक व  श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्‍हाण यांचे कुंटुंब आपुलकीच्‍या नात्‍याने दृढ बांधले गेले  होते. अशा आठवणी 'शांतिदूत' या गोविंदराव पाटील चिखलीकर  यांच्‍या (गौरव )स्‍मृती ग्रंथात विस्‍ताराने आल्‍या आहेत. चव्‍हाण -चिखलीकर यांच्यातील राजकीय विरोध या नाते संबंधाना पुन्‍हा जवळीकता आणणारे  ठरले ? तर जिल्‍ह्याच्‍या राजकारणाला नवी दिशा मिळेल (? किंबवना भूमीपुत्राची  बाहेरील नेतृत्वा शी लढाई अधिक तीव्र होऊ शकेल?

स्‍व. गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्‍या शांतिदूत या गौरवग्रंथात श्रद्धेय शंकरराव चव्‍हाण व कुसूमताई चव्‍हाण यांच्‍या कौटूंबिय नाते संबंधाचा उल्‍लेख पानोपानी आहे. पद्मश्री श्‍यामराव कदम,स्वा. सै. साहेबराव बापू बारडकर,भुजंगराव पाटील किन्‍हाळकर, गोविंदराव पाटील चिखलीकर, निवृत्‍ती पाटील जवळगावकर, बळवंतराव पाटील,गोविंदराव झरीकर किशनराव राठोड, लक्ष्‍मणराव हस्‍सेकर, बाबासाहेब गोरठेकर ही सर्व प्रमुख मंडळी साठ सतर ऐंशीच्‍या दशकात डॉ. शंकरराव चव्‍हाण यांच्‍या सोबत होती.' शांतिदूत ' मध्ये स्‍वतः प्रतापरावांनी आपल्‍या मनोगतातअनेक अनुभव विशद केले त्‍याला राजकीय झालर न देऊ देता श्रदेय डॉ शंकरराव चव्हाण व गोविंराव पाटील चिखलीकर यांचे कोटुंबिक आपुलकी आणि आपलेपणाचे नाते  किती दृढ होते हे सांगितले आहे. त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही गोविंदराव पाटील चिखलीकर यांना कुसुमताईनी भाऊ मानले. दोन्‍ही कुटूंबीयात जिव्‍हाळा -आपलेपणा होता. डॉ.शंकरराव चव्‍हाण यांना पाच मुली पैकीतीन मुलींची बोळवण गोविंदराव पाटील यांनी चिखलीत केली. मामा म्‍हणून इतके जवळचे संबंध होते की, त्‍या संबंध नात्यागोत्या इतके घट्ट.  

१९८४ ला डॉ. शंकरराव चव्‍हाण भारताचे गृहमंत्री होते. ते नांदेड दौ-यावर आले. त्‍यावेळी कुसुमताईनी भाऊबीजेला चिखलीला जायचं आहे असं सांगितले . आणि डॉ शंकरराव चव्‍हाण आणि कुसुमताई हे चिखलीला आले .गावाला भारताचे गृहमंत्री आले हे पाहून संगळं गाव भारावून गेले दिवाळी अविस्मरणीय झाली ही आपुलकी होती. श्रद्धेय शंकरराव चव्‍हाण कुठेच 'काम झालंय असं सांगत 'नव्‍हते .ते काम करत होते. १९८४ ला प्रतापरावांनी' साहेबांना शाळा पाहिजे असं सांगितलं २५ रूपयांच चलानं भरलं त्‍यावेळी सुधाकरराव नाईक शिक्षणमंत्री होते. साहेब सुधाकररावांशी बोलले आणि  शाळा मिळाली . लहानभाऊ  शयामसुंदर हे डॉक्टर व्हावेत अशी बाबाची पण मार्क कमी पडले तेव्हा स्वतः कुसुमताई प्रवरा मेडिकल कॉलेज  एम बी बी एस साठी श्री विखे यांच्याशी बोलल्या आणि अडमिशन झाले पुढे प्रकृतीमुळे ते शिक्षण घेता असले नाहीअसे प्रतापरावपाटील यांनी ' गौरव ग्रंथात" माझे बाबा" मध्‍ये नमूद केले.

माजी मुख्‍यमंत्री अशोकराव चव्‍हाण हे नांदेडला राहायला आले तेव्‍हा पासूनच्या आठवणी ''शांतिदूत' मध्‍ये आहे. १९९२ ला शंकरराव चव्‍हाण यांच्‍यामुळे जि.प. मध्‍ये संधी मिळाली. पहिल्‍याच टर्ममध्‍ये सभापती होता आले हे सविस्‍तराने आले आहे. राजकारणात कौटूंबिक नाते -संबंध दीर्घकाळ टिकत नाहीत याचा अनुभव गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत येतो त्‍याला चव्‍हाण -चिखलीकर- किन्‍हाळकर -कदम - गोरठेकर कुटूंबीय अपवाद कसे ठरतील. डॉ. शंकरराव चव्‍हाण यांच्‍या सोबत असलेले पद्मश्री श्‍यामराव कदम, गोविंदराव पाटील चिखलीकर, भुजंगराव पाटील किन्‍हाळकर, बाबासाहेब गोरठेकर या कुटूंबीयांचा जिव्‍हाळ्याचा संबंध होता. लोह्याच्‍या माणिकराव पाटील पवार, कै. व्‍यंकटराव मुकदम या परिवारांचा शंकरराव चव्‍हाण यांच्‍याशी कौटूंबिक संबंध होता तो आता पुढच्‍या पिढीच्‍या राजकारणात  राहिला नाही. चव्‍हाण विरूद्ध उपरोक्त सर्व कुटूंब  असे त्‍या त्‍या भागातले राजकारण सद्या आहे. 

राजकारणात जे सुरूवातील मदत करतात ते दुरावतात आणि जे विरोध करतात ते जवळ येतात असा अनुभव असतो. तो जिल्‍ह्याच्‍या राजकारणात  प्रभावी असलेले नेतृत्‍व अशोकराव चव्‍हाण यांच्यासह विरोधकांना ही लागु पडतो. चिखलीकरांशी असलेल्‍या कौटुंबिक नात्‍याचा जिव्हाळा कडवटपणात रूपांतरित झाला . दोन्‍ही नेतृत्‍वांनी वडीलांच्‍या नातेसंबंधना फरकत दिली असा सूर शांतिदूत गौरव (स्‍मृती) ग्रंथाच्‍या निमिताने ऐकायला मिळाला. जे कुटूंबीय श्रद्धेय शंकरराव चव्‍हाण यांच्‍या सोबत होत त्‍यात पद्मश्री श्‍यामराव कदम, -खतगावकर- बारडकर, चिखलीकर -गोरठेकर, -किन्‍हाळकर- राठोड ही सगळी मंडळी आज अशोकरावापासून दूर आहेत ते त्‍यांचे कट्टर विरोधक.  परिवर्तन हा काळाचा नियम .तअशोकरावांनी राज्‍याचं नेतृत्‍व करायचं (जसे डॉ. शंकरराव चव्‍हाण करायचे)आणि त्‍या त्‍या भागात तेथील नेतृत्वाला प्रखर  विरोध न करण्याचे   धोरण अवलंबायला हवे .जिल्ह्याला अशोकरावांच्या नेत्तृत्वाची गरज तशी त्यांना विरोधकांचे पाठबळ असायलहवे.( विलासराव देशमुख जसे जिल्ह्यात राजकारण करायचे)या राजकीय चर्चे सोबतच भूतकालीन संबंधाचे दाखले दिले जात आहेत

अशोकराव चव्हाण याची  सद्याची टीम व विरोधक पहाता त्‍यांना सातत्‍याने जिल्‍ह्यावर लक्ष द्यावे लागत आहे. त्‍यामुळे राज्‍यातील आपली पकड मजबूत करण्‍यासाठी जास्‍तीचा वेळ देता येत नाही .सध्याची  टीम आहे ती संपूर्णजिल्‍ह्यात प्रभाव पाडणारी नाही उलट विरोधकांची विस्‍कटलेली ताकद असूनही प्रभावी दिसते आहे. देश ,राज्‍याच्‍या बदलत्‍या राजकारणाचा विचार करता अशोकरावांनी बेरजेचच्या  राजकारणाला 'हातचे' धरायला पाहिजे .शांतिदूतच्‍या निमिताने पुन्‍हा एकदा शंकरराव चव्‍हाणांवर प्रेम करणा-या कुटूंबीयांचे कसे  विस्‍मरण झाले विरोध होतो आहे हे  चिखली त चर्चेला आले. भूमीपुत्रांच्या लढाईला साथ- सोबत द्यावी असे आवाहन करण्यात आले. जुने सोबत घेऊन  त्‍यातून नव्‍या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव जिल्ह्याच्या नेतृत्‍वांसाठी फायदेशीर ठरू शकते.?

    Tags