BREAKING NEWS

logo

माहुर, शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे म्हणून शासनाने भाजीपाला व फळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारांना नियमनातून यापुर्वीच मुक्त केले. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना विकता यावा साठी शासनाने दंडक केला असला तरी माहुर च्या आठवडी बाजारात शेतकर्यांना लिलावत आज हि 20 टक्के आडत मोजावी लागत असल्याने शेतकर्यांची पिळवनुक होत आहे.हा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समीती पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या अठवडी बाजारात घडत असुन कृउबा समीती ची बघ्याच्या भुमिके मुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

अडत्यांना द्यावा लागणारा पैसा वाचवा व व्यापाऱ्यांकडूनही लूट थांबावी म्हणुन राज्य शासनाने गत वर्षी जुलै महिण्यात निर्णय घेत शेतकर्यांच्या भाजीपाला व फळांना आडत मुक्त करत शासनाने व्यापारी, दलाल यांची दंडुकेशाही मोडीत काढण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केले.या निर्णयातून शेतकऱ्यांना आपला भाजीपाला,फळे विकताना कुणालाही कमीशन द्यावे लागणार नाही असा नियम केला. निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला.परंतु माहुर तालुक्यातील माहुर,वाई,वानोळा येथिल आठवडी बाजारात या निर्णयाला पायदळी तुळवत येथिल तिन ते चार ठराविक दलाल शेतकर्यां कडुन सर्रास 20 टक्के कमीशन घेत आहेत. याकडे कृउबा समीतीचे साफ दुर्लक्ष केल्याने शेतकर्यांची लुट सुरु आहे. या बाबत कृउबाचे सभापती दतराव मोहिते यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात मिळालेल्या माहिती वरुन आडत्यांना पंधरा दिवसा पुर्वीट नोटीस बजावल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात कार्यवाही शुन्य असल्याने तिन अठवठी बाजारातुन लाखात कमीशन पोटी शेतकर्यांना भुर्दंड बसत असुन शेतकर्यांचा पुळका असलेले सर्वच तथाकथित नेते मंडळी आज तरी गंधारीच्या भुमिकेत दिसुन येत आहे.

    Tags