BREAKING NEWS

logo

माहूर, आखिल भारतिय मराठी पत्रकार संघाच्या माहुर तालुकाध्यक्ष पदी सरफराज हाजी कादर दोसाणी तर सचिव पदी राजकुमार पडलवार यांची एकमता निवड करण्यात आली.

काल दिनांक 25(रवीवार) रोजी रमजान इदच्या पुर्व संध्येला अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ शाखा माहुर ची वार्षिक बैठक स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळेत संघटनेचे मावळते अध्यक्ष अनिल रुणवाल यांच्या अध्यक्षतेखालील तर जेष्ठ पत्रकार दत्तराव मोहिते,हाजी कादर दोसाणी,राजकुमार भोपी,विजय आमले,विश्वनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी पत्रकार संघांच्या सदस्यांनी पत्रकारांच्या विविध समस्येवर साधकबाधक चर्चा केली.त्यांनतर जेष्ठ पत्रकार दतराव मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पत्रकारांवरील हल्ले,पत्रकारांच्या इतर समस्या,पत्रकारांचे संघटन वाढविणे,ग्रामिण पत्रकारांना अधिस्विकृतीचा लाभ मिळणे अशा एक ना अनेक समस्या पत्रकारांच्या असुन या करीता अखिल भारतीय मराठी पत्रकार संघसंपुर्ण महाराष्ट्रात जोमाने कार्य करीत आहे. या संघटनेव्दारा अनेक पत्रकारांना न्याय मिळवून दिल्या जात असुन लोगोपयोगी कार्य ही संघटना सतत करीत आहे असे सांगितले.सभेच्या  सुरवातीला सचिव नंदकुमार जोशी यांनी प्रस्ताविकातुन मागील सभेचा वृतांत मांडला.व नंतर निवडप्रक्रीयेला सुरवात झाली.यात सरफराज हाजीकादर दोसाणी यांची एकमता ने अध्यक्ष पदी, गजानन भारती सर (उपाध्यक्ष), अमजद पठान, (उपाध्यक्ष) राजकुमार पडलवार(सचिव), अर्जुन जाधव, (सहसचिव), संजय सुरोशे (संघटक), कैलास बेहरे, (कोषाध्यक्ष) सल्लागार राजकुमार भोपी, पुंडलिक पारडकर, हाजी कादर भाई दोसाणी,विजय आमले, दतराव मोहिते,नंदकुमार जोशी, विश्वनाथ कदम, अनिल रुणवाल, तर कार्यकारी सदस्य कार्तीक बेहरे, भिमराव पुनवटकर, यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार बालाजी कोंडे, युवराज राठोड, प्रल्हाद चव्हाण,सुभाष खडसे,रुपेश दिक्षित, संदिप पडलवार, गणेश निळकंटवार, राम दातीर, दिनेश यवतकर, फिरोज खान, हैदर खान यांची उपस्थिती होती. संचलन गजानन भारती तर आभार कैलास बेहरे यांनी मानले.

    Tags