BREAKING NEWS

logo

माहूर, जिल्ह्याचा शेवट च्या टोकावर असलेल्या माहुर तालुक्यात दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांसह प्रतिनियुक्ती वर असलेल्या आणी अनाधिकृत गैर हजर राहणार्‍या  कर्मचाऱ्याची आज परत एकदा पोल खोल झाली आहे.आज दि.29(गुरवार)रोजी जिल्हापरिषद चे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी अचानक गट सधान केंद्र सर्व शिक्षा अभियान,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,पंचायत समिती,नवी आबादी व धर्मवाडी शाळेला भेट देऊन झडाझडती घेतली असता हजर कमी अणी गैरहजर च जास्त असे काहिसे चित्र पहावयास मिळाले.संतापलेल्या उपाध्यक्षांनी या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे व जिल्हा महिला बालविकास अधिकारी सिंगणे यांना माहिती दिली व अनुपस्थित कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच केले.

गटसधन केंद्र पंचायत समिती माहुर या ठिकाणी सर्वप्रथम सकाळी साडे आकरा च्या सुमारास उपाध्यक्ष समाधान जाधव व गटविकास अधिकारी युडी मंडाळे यांनी भेट दिली असता गटविकास अधिकारी नदीम शेख, वरीष्ठ लेखा सहाय्यक भाऊसाहेब नेटके,डाटा ऑपरेटर अविनाश पोस्पुलवार, विषय तज्ञ ओ.डी राठोड ,विषय तज्ञ एस.के.कडु,श्रीमती ठाकुर,मोबाईल शिक्षक डि.एस.मुंडे हे दहा पैकी आठ लोक गैरहजर आढळून आले.तर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात एकुन चार कर्मचाऱ्यां पैकी तिन जण गैरहजर होते केवळ परिचारिका पि.जी.गरुडे ह्या उपस्थित होते.विस्तार अधिकारी ढगे हे पदभार स्वीकारल्या पासुन गैरहजर आहेत.यांच्या कडे मुखेडचा अतिरिक्त पदभार असल्याचे कळाले.अनुपस्थीत असलेले प्रभारी प्रकल्प अधिकारी दत्ता कदम यांनी तर गैरप्रकाराचा कळस गाठला असून मस्टरवर महिणा भरण्याचा आगोदरच तपासणीच्या रजिस्टर वर सह्या करून सगळेच अलबेल असल्याचा पुरावा जोडला आहे.समान्यांची नाळ जोडलेल्या पंचायत समितीत हि परीस्थीती या पेक्षा वेगळी नव्हती.पस तिल 40 कर्मचाऱ्यां पैकी तिन कर्मचारी जेवायला,तिन बाहेर गावी असल्याचे समजले. वास्तविक पाहता मध्यांत भोजनाची वेळ दोन ते अडीच ची असतांना साडे बारा वाजता च तिन कर्मचारी जेवायला गेलेले आढळून आले.मग्रारोहो मध्ये केवळ एक कर्मचारी, बांधकाम विभागात एक दौर्‍या वर तर कँटीन मध्ये,कृषी खात्यातील धोंडे मॅडम बोंडगोव्हाण ला, विस्तार अधिकारी चिटकुलवार चार दिवसा पासुन विना अर्ज अनाधिकृत गैरहजर, वरिष्ठ सहाय्यक शिखरे रुजु झाल्यापासून अनाधिकृत गैरहजर,वरिष्ठ सहाय्यक सय्यद एम.आर.अनाधिकृत गैरहजर, तर या झडाझडीत दोन कर्मचाऱ्यांना किनवट च्या गटविकास अधिकाऱ्यांनी पडविल्याचे समोर आले. या कार्यालयातील हस्तप्रणाली योजना पासवर्ड अभावी धूळखात पडुन आहे.तत्कालीन मुकाअ अभिमन्यु काळे यांनी सुरु केलेल्या हस्तप्रणाली योजने ला कार्यान्वित करण्या बाबत मुकाअ अशोक शिंगारे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये हस्तप्रणाली साठी 13 हजार 500 रुपये चौदा वित अयोगाच्या निधीतुन कपात करण्यात आले होते.परंतु अद्याप कुठल्याहि ग्रापला बायोमेट्रिक यंत्र आलेले नाही.जि.प.उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी या नंतर शहरातील नवि आबादी व धरमवाडी जिप शाळेला भेट दिली व समाधान व्यक्त केले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली नसल्याची माहिती दिल्याने तत्काळ संबधितांना सुचना केल्याने डाॅ.ए.डी.अंबेकर, डाॅ.एस.ओ. मुंगिनवार, औषध निर्माता सिकंदर राठोड यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली.एकदरीत आज च्या झडाझडीती मुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले असुन गैरहजर आढळून आलेल्या कर्मचाऱ्या वर मुकाअ अशोक शिंगारे हे काय कार्यवाही करतात या कडे लक्ष लागले आहे.

    Tags