BREAKING NEWS

logo

माहूर, माहुर येथिल 108 च्या रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक करीत असतांना विदर्भातील यवतमाळात शहर पोलीसांनी रुग्णवाहिकेच्या ड्रायवरला रंगेहात पकडले.या घटने मुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असुन 108 रुग्ण वाहिकेची प्रतिमा पण मल्लीन झाली आहे.


ग्रामीणसह शहरी भागात एखादा रुग्ण अत्यावस्थेत असेल तर त्याला तातडीने उपचार मिळण्यात अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागातील रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहचत नसल्याने त्याला आवश्‍यक ते उपचार मिळत नाहीत, तातडीचा प्रसंग उद्‌भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. आपत्कालीन स्थितीत एकही जण उपचाराविना दगावता कामा नये, वेळेवर नजीकच्या शासकीय रुग्णालयात रुग्ण पोहचावे. याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. या सेवेचा लाखो रुग्णांना लाभ हि झाला.मात्र आदिवासी बहुल दुर्गम भागातील माहुर तालुक्यात 108 ची सेवा नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. त्याचा त्रास येथिल ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असणार्या वैद्यकीय अधिकार्यांला होतो आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात असणारे 108 चे कर्मचारी व वाहन वेळेवर उपलब्ध झाले नाही. तर रुग्णांचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालयाच्या डाॅक्टरांना दोषी समजतात. वास्तविक पाहता 108 हि स्वतंत्र संस्था असून बि.वि.जी.कंपनी कडे याचा करार आहे.परंतु हि बाब रुग्णांना माहित नसल्याने सतत वाद होत राहतात.काल दि.29(गुरवारी)तर 108 च्या चालकाने कळसच गाठला चक्क रुग्णवाहिका क्रमांक एमएच 14 सीएल 8222 या शासकीय रुग्णवाहिकेतून दारू घेऊन जात असल्याची माहिती यवतमाळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचुन पांढरकवडा रोडवर रुग्णवाहिकेची तपासणी केली, असता त्यात देशी-विदेशी मिळून एकूण आठ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. बीट जमादार जगदीश किसन राठोड (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवतमाळ पोलिस ठाण्यात चालक गजानन जैस्वाल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे 108 ची प्रतिमा मल्लीन झाली असुन बि.वि.जी कंपनीने विश्वासार्हता गमविल्याने त्या कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

    Tags