BREAKING NEWS

logo

माहूर, पर्यावरण संतुलीत ठेवण्या साठी  दरवर्षीच शासन वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवित असते.परंतु झाडे लावल्यावर त्यांचे संगोपन केले जात नसल्याने तेच खड्डे तेच झाड हि पंरपंरा सुरु आहे.हे मोडीत काढण्यासाठी लावलेली झाडे जगवा असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.
 
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ आज दि. 1 जुलै रोजी सकाळी 10 वा. माहुर येथील दत्तशिखर मंदिर परिसरात महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या हस्ते तर पालकमंत्री ना.अर्जुन खोतकर,आमदार प्रदिप नाईक,जिपचे उपाध्यक्ष समाधान जाधव,नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील,जिपचे मुख्याधिकारी अशोक सिंगारे,जिल्हा नियोजन अधिकारी थोरात, उपविभागीय महसूल अधिकारी रविंद्र देशमुख, जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष ठाकरे, तहसीलदार सिद्धेश्वर  वरणगावकर पस चे सभापती मारोतराव रेकुलवार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव काम,उपप्रमुख जोतिबा खराटे,यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ना.खोतकर म्हणाले की,जिल्ह्य़ात लावण्यात येत असलेल्या 17 लक्ष झाडा पैकी अर्धे झाडे जगविण्याचा प्रयत्न केल्यास योजनेचे उद्दीष्ट लवकर पुर्ण होईल.असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.आमदार प्रदिप नाईक यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरी देऊन एका दाम्पत्यास ग्राप मार्फेत  लावण्यात येणारे दोनशे झाडे जगविण्याची जवाबदारी द्यावी हि मागणी ना. खोतकरांनी जागेवरच मान्य करुन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आदेशित केले. यावेळी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक रहमत अली,इलियास बावाणी, गोपु महामुने,दिपक कांबळे,नगरसेविका कु.शीतलताई जाधव, ज्योती विनोद कदम,प्रिया राज गंदेवाड, आशाताई जाधव, श्रीमती कपाटे तालुका शिवसेना प्रमुख दिपक कन्नलवार, मेघराज जाधव, प्रा.भगवानराव जोगदंड, निरधारी जाधव अमजद खान यांची उपस्थिती होती. नगरपंचायतीच्या वतिने काढण्यात आलेली वृक्ष दिंडी यावेळी मुख्य आकर्षण ठरून अवघी माहुर नगरी वृक्ष वल्ली आम्हा सोयरेच्या नादात दुमदुमून गेली होती.

वनविभागाचे ढिसाळ नियोजन 
पालकमंत्री ना.अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्ह्याचा वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ आयोजित करण्यात आल्याने त्याची व्याप्ती किती याचे तारतम्य नसल्याचे वनविभागाच्या ढिसाळ नियोजाने स्पष्ट झाले आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ पन्नास खुर्च्याची व्यवस्था करण्यात आल्याने उपविभागीय महसूल अधिकारी रविंद्र देशमुख,तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर,मुख्यकार्यकारी अधिकारी व अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना सुमारे दोनतास तिष्ठत उभे राहावे लागेल.परंतु याची वनविभागाला ना खंत ना लाज.

    Tags