logo

माहुर/नांदेड , दत्त शिखरावर जाणाऱ्या मातृतीर्थ रोडवरील जंगलात काही लोक जुगार खेळीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकातील प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी छापा मारला. या ठिकाणी 14 लोक जुगार खेळत असतांना अढळले. त्यापैकी सात जण फरार होण्यास यशस्वी झाले, तर सात जणांना पथकाने पकडले. हि कार्यवाही आज दि.05 (बुधवार) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. 

माहुर येथिल मातृतीर्थ रोड वरील एक कि आत असलेल्या जंगलात जुगाराचा खेळ सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या पथकातील प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचुन जायमोक्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी नगदी 27 हजार 500 रुपये व चार दुचाकी एक अॅटो असा एकुन 3 लाख 98  हजार 500 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळीत असलेले 14 जुवारी पैकी शे.सत्तार शे.लाल, शे.अश्फाक शे.मुनाफ रा माहूर, शे.इसराइल शे.मुसा, सतीश प्रकाश कांबळे रा. सारखनी, संदीप संजय राठोड रा. माहूर यांना अटक करण्यात आली आहे. तर जंगलाच्या झाड झुडपांचा फायदा घेऊन, शे. अमिन शे. इमान, शे. इम्रान शे. उस्मान, शे.तौफीक शे. इसराल( जुगार चालवणारा) शे.फिरोज शे. इसाक सर्व रा. माहूर व इमरान वडसा ता. माहूर, शे बाबा, मुजीब बेग, प्रतिक कांबळे,  परेश बोरकर माहूर हे फरार झाले असल्याचे पथक प्रमुख चिंचोलकर यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना सांगितले. पकडलेल्या जुगार्यांना माहुर पोलीसांच्या हवाली केले असुन, आजच्या कार्यवाहीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हाभरात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांचे पथक प्रमुख ओंकान्त चिंचोलकर व त्यांच्या टीमकडून कार्यवाहीचा धडाका सुरूच आहे. आजवर सर्वात जास्त कार्यवाह्य ह्या किनवट/माहुर ठाण्याच्या हद्दीत झाल्याने, येथे कार्यरत पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

    Tags