logo

माहुर, तेलंगानाच्या आदिलाबाद वरुन माहुर कडे बंदी असलेला गुटखा मारोती स्विफ्ट कारमधून तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा रचुन नऊ लाख साठ हजारा चा मुद्देमाल जप्त केला.व तिघांना ताब्यात घेतले.हि कार्यवाही किनवट तालुक्यातील मांडवी पोलीस ठाण्याहद्दीत आज दि.7(शुक्रवार )रोजी विशेष पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रीशोर  मिना यांचे विशेष पथक गस्तीवर असतांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी आज दुपारी सापळा रचून गूटखा तस्करी करीत असलेली मारुती स्विफ्ट कार क्र.एम.एच.40 के.आर.8881ची तपासणी केली असता गाडीत 18 थैली आर के नामक गुटखा आढळून आला.हा गुटखा अदिलाबाद वरुन मांडवी मार्गे माहुर ला जात होता.या प्रकरणी बंदी असलेल्या गुटखा तस्करी करणारे सय्यद जाकीर सय्यद पाशा(25),शेख अजगर शेख फकीर महम्मद(40),शेख आसिफ शेख गफ्फार(22) सर्वे रा.माहुर यांना ताब्यात घेऊन मांडवी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक व हप्ते खोरीत अन्न व औषधे प्रशासन गुंग असुन न्यायालयाच्या आदेशान्वये सदरचे गुन्हे याच विभागाने दाखल करावे असे निर्देश असल्याने हे खाते घटना स्थळी पोहचेल कधी अन् जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ठरवेल कधी या बाबत अजुन हि शासंकता आहे.दरम्यान माहुर किनवट तालुक्यातील अवैध धंदे मोडीस काढण्यासाठी पथकाने विढा उचलणार असुन सतत या विभागातील पोलीस ठाण्याहद्दीत कारवाई सुरु असल्याने संबधीत ठाणेदाराच्या कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.अवैध व्यवसायीकांसह दारूबंदी व अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक पोलीसांना पोलीस अधिक्षकांच्या पथकाच्या धडाकेबाज कारवायामुळे धसका घेतला असला तरीही, मात्र हे अवैध्य धंद्यावर कुठलीच कारवाई करीत नसल्याचे दिसून येते.

    Tags