logo

माहुर, अनेक दशकापासुन प्रलंबित असलेल्या माहुर-अदिलाबाद-वाशिम मार्गे पुसद या 225 कि.मी.च्या अभियांत्रीकी तथा वाहतुकी रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला दिड वर्षापुर्वी मंजुरी मिळाली होती.मात्र अद्याप सर्वेक्षणाला प्रत्येक्षात सुरवात न झाल्याने आता खासदार राजीव सातव यांनी पुढाकार घेतला असुन त्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच माहुर चे एक शिष्ट मंडळ दिल्ली येथे रेलमंत्री सुरेश प्रभु यांची भेट घेणार आहे.रेंगाळलेले लोहमार्ग सर्वेक्षण मार्गी लाऊ अशी ग्वाही सुद्धा खासदार राजीव सातव यांनी दिली.

हिंगोली लोकसभेचे खासदार राजीव सातव हे आज दि.15 रोजी माहुर येथे ईद मिलन निमित्त नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या निवासस्थानी आले होते.यावेळी हाजी कादर दोसाणी व पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसाणी यांनी त्यांचा स्वागत सत्कार केला.यावेळी खा.राजीव सातव यांच्या समवेत आमदार प्रदिप नाईक, जिप उपाध्यक्ष समाधान जाधव,जिप सदस्य मधुकर बाबाराव राठोड,दिनकर दहिफळे, किनवटचे नगराध्यक्ष साजिद खान, जिपचे माजी उपाध्यक्ष प्रकाश राठोड,कृउबाचे सभापती दतराव मोहिते,अनिल कराळे,पस सभापती मारोतराव रेकुलवार,यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्राच्या रेल्वेविषक स्थायी समीतीवर सदस्य असलेले खा.राजीव सातव यांनी तिर्थक्षेत्र माहुर व बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी जाण्यासाठी माहुर -वाशिम रेल्वेमार्गा च्या सर्वेक्षणा करता या पुर्वी लोकसभेत अनेक दा प्रश्न उपस्थित केले होते.त्यामुळे सर्वेक्षण मंजुर होउन 2645 कोटीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने केंद्रा कडे सादर केला होता.परंतु अद्याप सर्वेक्षणाला सुरवात न झाल्याची बाब पत्रकारांनी खा.सातव यांच्या निर्देशनात आनुन दिली असता पत्रकाराच्या शिष्टमंडळास व आमदार प्रदिप नाईक यांना त्यांनी दिल्ली चे निमंत्रण देऊन रेलमंत्री सुरेश प्रभु च्या भेटीचे आश्वासन  दिले.या वेळी गिरीष नेम्मानिवार,हाजी उस्मान खान चांद खान,मेघराज जाधव,उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी,नगरसेवक रहमत अली,रफीक सौदागर,अजिज भाई,विनोद कदम,अमजद पठान,विनोद राठोड,कचरु जोशी,नावेद खान,किशोर चव्हाण, प्रा.भगवानराव जोगदंड,जहिर खान,तानुभाई मुख्याधिकारी काकासाहेब डोइफोडे,नंदू संतान,बालाजी कोंडे यांची उपस्थिती होती.

    Tags