logo

माहुर, राज्य शासनाने मंजुर केलेल्या 216 कोटी 86 लाखाच्या आराखडय़ातुन चालु वर्षात पहिल्या टप्प्यातील 78 कोटी रुपयांतुन तिर्थक्षेत्र माहुरचा विकास होणार आहे. रेणुका देवी, दत मंदीर, देवदेवश्वर, सोनापिर दरगाह, शेखफरीद दरगाह, मातृतिर्थ परीसरात जलदगती ने कामे पुर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरीत आराखडे सादर करावे, याकामी गय केल्यास अथवा निधी परत गेल्यास संबधितावर कार्यवाही करण्याचा इशारा नुतन जिल्हाधिकारी अरुन डोंगरे यांनी दिला.

काल दि.12 (शुक्रवारी)तहसील कार्यालयात माहुर विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच विभाग प्रमुखा समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील,उपविभागीय महसुल अधिकारी स्वप्नील मोरे,जिल्हा नियोजन अधिकारी,सुरेश थोरात, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एस.एस. राठोड, तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर,नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांची उपस्थिती होती.

राज्यातील कोल्हापूर,तुळजापूर सह इतर तिर्थक्षेत्राच्या तुलनेत तिर्थक्षेत्र माहुर विकासा पासुन वंचित होते,मात्र गत दोन वर्षांच्या कालावधीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी रेणुकादेवी ते शेख फरीद वझरा रस्त्या साठी 29 कोटी व 16 कोटीच्या वळण रस्त्याला मंजुरी दिली.सदर चे काम प्रगतीपथावर असुन 32 कोटी 50 लाखाचे रोप वे चे काम हि सुरु होणार आहे.त्यातच भर म्हणून राज्य शासनाने 31 मार्च 2017 रोजी 216 कोटी 86 लाखाचा माहुर विकास आराखडा मंजुर केला.हा निधी तिन टप्प्यात मिळणार असुन पहिल्या टप्प्यातील 78 कोटी तुन 31 मार्च 2018 प्रर्यंत कामे पुर्ण करण्यासाठी कालच्या बैठकीत संबधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावले.रेणुका देवी गडाच्या विकासाला अडसर ठरणाऱ्या वनविभागाच्या 4.90 हेक्टर जमिन संपादनाचा प्रस्ताव नागपुराला पाठविण्याचा सुचना हि यावेळी जिल्हाधिकारी अरुन डोंगरे यांनी संबंधितांना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परीवारा सह रेणुका मातेचे दर्शन घेतले.या वेळी संस्थांच्या वतिने तहसीलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरनगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, समिर भोपी, आशिष जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष रमाकांत खरात, यांनी त्यांचा सत्कार केला.

    Tags