logo

BREAKING NEWS

पंचायत समिती सभापतीसह चौघे हि सुखरुप

माहुर, माहुरवरुन किनवटकडे जात असतांना सारखणी फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने मारुती स्वीफ डिजायर कारला भिषण अपघात झाला. चार पलट्या होउन कार दरीत कोसळल्याने कारचा चकनाचूर झाला. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून सभापती मारोती रेकुलवार सह सोबतच्या तिघांना कुठलीही दुखापत झाली नाही. हि घटना आज दि.13(शनीवार)रोजी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास घडली.

पंचायत समितीचे सभापती मारोती रेकुलवार,तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष संतोष कोपूलवार,चालक प्रेम चव्हाण हे माहुर वरुन किनवट ला मारोती स्विफ्ट क्रमांक एमएच 27 ए.आर.8631 जात होते. आचानक स्टेरिंग लाॅक झाल्याने चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला.व गाडी रस्त्याचा खाली दरीत कोसळली. आपघात इतका भिषण होता की कार चकनाचूर झाली.मात्र सुदैवाने कुठलिहि जिवीत हाणी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,मेघराज जाधव,नंदु सिद्धेवार, आरीफ बानाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली.तर आ.प्रदिप नाईक ,जिपचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी दुरध्वणी वरुन सभापती रेकुलवार यांच्या प्रकृतीची विचारना केली.

    Tags