logo

BREAKING NEWS

घराबाहेर झोपलेल्या तिघावर अस्वालाचा हल्ला! एक गंभीर जखमी!

वन्य प्राण्यांची मानव वस्ती कडे धाव;नागरीकात दहशत

माहुर, रात्री घराबाहेर झोपेत असलेल्या तिघा जणांवर अस्वलाच्या जोडीने हल्ला केल्याने एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना माहुर शहरातील भरवस्तीत आबासाहेब नगर मध्ये काल दि. 15 (सोमवार)रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. वन्य प्राण्यांचा वाढत्या हल्ल्याने नागरीकात दहशत निर्माण झाली आहे. 
 
गत वर्षी पाऊसाचे प्रमान अधिक  असुन हि वन विभागाने नियोजन शुन्य कारभारामुळे व कृतीम पाणवठे उभारल्या न गेल्याने जंगलात पाणी उपलब्ध नाही.  वन्य प्राणी जंगलात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तहान भागविण्यासाठी वस्ती कडे येत असुन जंगला लगत च्या गावात यावर्षी मानवावर जंगली जनावरांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. काल माहुर शहरातील गजबजलेल्या वस्तीच्या ठिकाणी अस्वलाच्या जोडीने घरासमोर झोपेत असलेल्या संतोष सुरेश शिंदे, सुरेश शिंदे, सौ सुमन शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर अस्वालांनी तिथुन पढ काढला. तिघांवर हि माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.गंभीर जखमी असलेल्या संतोष ला पुढिल उपचारासाठी यवतमाळ किंवा पुसद ला नेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला असुन, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व वनविभागाच्या वतीन कुठलीच मदत मिळत नसल्याने त्यांचा वर माहुरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वनविभागाने कागदावरच दाखवलेल्या उपाय योजने मुळे यावर्षी वनतळी, गावतळी, पाझर तलाव, बंधारे यांच्यात पाणी फारसे साठलेच नाही.जे होते,ते एप्रिल महिन्यात आटून गेले. वनक्षेत्रात कोठेही पाणी राहिलेले नाही. परीनामी वन्यजीवांची पाण्यासाठी मोठी वणवण सुरू आहे. वन्यप्राण्यांकडून वस्तीत येऊन शिकार करण्याच्या वाढत्या संख्येमुळे मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. याचा भविष्यात पर्यावरण संतुलनावर परिणाम होऊ शकतो. वन्यप्राणी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढल्यास त्यांची सुरक्षितता धोक्‍यात आली असुन नागरीकांना हि दहशतीखाली राहण्याची वेळ आली आहे.

    Tags