logo

BREAKING NEWS

मागेल त्याला शेततळे योजनेला सुरवात !

उद्दीष्टपूर्तीसाठी कृषी विभागाची दमछाक ...

माहुर, मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत शेततळे उदिष्ठपुर्तीसाठी कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यात 240 शेततळे कृषी विभागाच्या माध्यमातून पुर्ण करण्याचा लक्षांक असुन शेतकर्‍यांना या योजने बद्दल ची माहिती व फायदे लक्षात आणुन देण्यासाठी कृषी विभाग गावा गावत जाउन जनजागृती करत आहे.

राज्य शासनाने सिंचन समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे हि महत्त्वकांशी योजना सुरु केली आहे.काल हिंगणी शिवारात 06 शेततळ्याचा कामाला सुरुवात करण्यात आली.शेतकऱ्यांनी ऑनलाइन शेततळ्यासाठी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाकृषी अधिकारी व्हि.एस.चन्ना यांनी यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना  केले आहे.यावेळी हिंगणी येथिल शेतकरी लोडबा पाचटकर, अशोक माळेकर,पांडुरंग टेकाळे,अरविंद सुरोशे,ग्यानबाजी सुरोशे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.संचलन व आभार कृषी सहायक विनोद कदम यांनी केले.

    Tags