logo

BREAKING NEWS

मागील तीन वर्षातील वनतळे निधी खर्चबाबत माहिती देण्यास वन विभागाची टाळाटाळ !

भ्रष्टाचाराची चौकशी गुलदस्त्यात!

माहूर, माहूरच्या जंगलात वनतळे कागदोपत्रीच झाल्यामुळे माहूर शहरात अस्वल व वाघ धुमाकूळ घालत असून काल तीन  वडार समाजाच्या नागरिकांवर झोपेत अस्वलांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी आहे.तरीही वन विभाग कुंभकर्णी झोपेत असून मार्च एंडची खोटी देयके बनविण्यात मग्न आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आदिवासी नेते नितीन तोडसाम यांनी दि. २५ एप्रील १७ रोजी व दि. ५ मे २०१७ रोजी याबाबत निवेदने देऊन वन्य प्राण्याच्या पेयजलाबाबत विचारणा केली होती परंतु पंधरवडा ओलांडून सुद्धा माहिती देण्यास माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी  टाळाटाळ चालविल्याने हे वन पाणवठे आहेत कि नाहीत यावर प्रश्न चिन्ह लागले आहे.

माहूर शहर परिसर डोंगराळ असून या परिसरात वाघ, अस्वलांचे खांडे रानडुकरांचे टोळके रोही नीलगाय चे कळप, संपूर्ण तालुक्यात जंगलात पाणी नसल्याने धुमाकूळ घालत असून नागरी जीवन धोक्यात आल्याने कागदी घोडेपाठविण्यात धन्यता मानवान वन विभाग शासनाच्या डोळ्यातधुळ फेक करीत असल्याचा आरोप होत आहे.वनविभागा अंतर्गत या वर्षी हडसणसी,वझरा,माहुर,तांदळा,कुपटी,अजणी येथे वृक्षारोपन (प्लॅनटेशन)ची कामे,तुलशी तांडा,तांदळा,पानोळा,येथे (डिप.सी.सी.टी.)ची कामे आनमाळ येथे वनतलाव, माहुर,शेफ वझरा,इवळेश्वर येथे (एलबिएस)ची कामे,दहेगाव, साकुर, मातीनाला बांध,व इतर कामे करण्यात आली.या पैकी काही कामे वनविभागाने स्वता तर काही कामाची निविदा निघाली होती.परंतु ऑनलाईन निविदा मैनेज करुन वनविभागाच्या अधिकार्यांने नातलगांला कामे देवुन सदर कामावर तालुक्या बाहेरील मजुर लावल्याची व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार 14 एप्रिल 2017 रोजी राज ठाकुर,गजानन भारती यांनी केली होती.मात्र अध्याप चौकशी गुलदस्त्यातच असल्याने उपवनसंरक्षक नांदेड यांचे भ्रष्टाचाराला पाठबळ तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माहुर वनविभागा अंतर्गत जलयुक्त शिवार, बाॅडीपिल्लर, दगडी पौड, रोपवाटिका, कुपडीमार केशर,रस्ते दुरुस्ती,माती नाला बांध अशी कोट्यावधी ची कामे झाली असुन त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने पारदर्शक राज्य शासनाचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी तक्रारीची दखल घेउन मुख्य वनप्रधान वनसंरक्षक नागपुर,व मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद यांच्या मार्फेत सखोल चौकशी करावी अशी मागणी जिपचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केली आहे.

अधिवेशनात शुन्यप्रहारात प्रश्न मांडणार - आ.नाईक
माहुर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याची अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने या संदर्भात 20 मे पासुन सुरु होणार्या अधिवेशनात शुन्यप्रहारात प्रश्न उपस्थित करुन भ्रष्टाचाराला पाठबळ देणार्‍या वर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचे या विभागाचे आमदार प्रदिप नाईक यांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली आहे.

    Tags