logo

नांदेड, अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी अतिरेकी संघटनेकडून अमानुष गोळीबार करून यात 7 शिवभक्त यात्रेकरूंना जीवे मारले आहे. त्याच्या निषेधार्थ दि. 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदूवादी संघटनेकडून तीव्र निषेध करून पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ परिवार व हिंदूवादी संघटनेकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करून दहशतवाद्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याचबरोबर अमरनाथ यात्रेकरूंतील अतिरेकी हल्ल्यात ठार झालेल्या 7 शिवभक्तांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. या संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

    Tags