logo

नांदेड (एनएनएल) काल मध्यरात्री पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाने किनवट पोलीस स्थानक हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्डावर धाड टाकली असून, या ठिकाणी ५ लाख ९६ हजार १७० रुपयाच्या मुद्देमालासह ११ प्रतिष्ठित जुगार्यांना अटक करण्यात आल्याची माहिती ओमकान्त चिंचोलकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.  

मागील महिन्यात झालेल्या किनवट - माहूर हद्दीतील धाडसत्राने गाजल्यानंतर गत आठवड्यात पोलीस अधिक्षक चंद्र्रकिशोर मीना यांनी स्वतः किनवट पोलीस स्थानका अचानक भेट देऊन पाहणी केली. स्थानिक अधिकारी सक्षम नसल्याने अवैध्य धंद्यांना चालना मिळत असल्याचे सुतोवाच केले होते. तसेच कामकाजात सुधारणा झाली नाही तर किनवटचे पोलीस निरीक्षक डॉ जगताप यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतरही किनवट तालुक्याच्या हद्दीत बोधडी येथे सुरु असलेल्या गजानन मुंडे यांच्या शेताती मोकळ्या टिनशेडमध्ये नामे गोपाळ मेश्राम व नागेश केंद्रे हे मोबाईलवरून लोकांना जुगार खेळण्यासाठी बोलावीत आहेत. अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून पाठक प्रमुख ओमकान्त चिंचोलकर व त्यांच्या सहकार्यांनी दि.१६ च्या रात्री २३.३० वाजता धाड टाकली. या ठिकाणी छुपा व आडोसा इंडिका विस्टा कार क्रमांक एम.एच.२६ डी१५९६ हि पत्त्याच्या डावास आडवी लावून काही इसम जुगार खेळत होते. संबंधित जुगार्यांकडून ५ लाख ९६ हजार १७० रुपयाच्या मुद्देमालासह गोपाळ मेश्राम वय ३५ रा.रामनगर, किनवट, विष्णू दराडे वय ३० वर्ष रा.बोधडी, नागेश केंद्रे वय २५ वर्ष रा.बोधडी, हनीफ मोहम्मद तीगाले वय ३२ वर्ष मोमीनपुरा किनवट, गनमत गंदेलवार वय ५८ वर्ष रा.बोधडी, संतोष वाकोडे वय ३२ रा.बोधडी, नंदकुमार दराडे वय ३६ वर्ष राया.बोधडी, संतोष नेमानेवार वय ३८ वर्ष रा.किनवट, मोहम्मद शिराज मोहम्मद जाफर वय ४६ वर्ष रा.साठेनगर किनवट, व्यंकना नरसिंगराव माडपेल्लीवार वय ३२ वर्ष रा.रामनगर किनवट, उदयकुमार शामराव केंद्रे वय ४४ वर्ष रा.बोधडी, या ११ आरोपीकडून ११ मोबाईल, एक कार, रोख रक्कम ७५ हजार ६५० रुपये झन्ना - मन्ना नावाचा जुगार खेळात व खेळवीत असताना ५ लाख ९६ हजार १७० रुपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली असल्याची माहिती ओमकान्त चिंचोलकर यांनी दिली. वरील जुगाऱ्यांवर मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या हलगर्जी व स्वार्थी पणाचा कळस उघड्यावर आला आहे. काल विशेष पथकाने धाड टाकून जुगारायण पकडले असले तरी स्थानिक पोलिसांनी पथक माघारी  फिरताच सर्व जुगार्यांना व्हीआयपी सवलत देऊन तातडीने जामीन मिळवून देण्यास मदत केली. या जुगाऱ्यामध्ये २ शिक्षक, एका ग्रामपंचात सदस्यांसह जुगार अड्डा चालवणारा राष्ट्रवादीच्या किनवट पंचायत समिती सदस्याचा मुलगा असल्याकने असल्यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावात आणि  मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकारची माहिती पोलीस अधीक्षक मीना यांच्या कानावर पोचली असल्याने याबाबत ते कोणती भूमिका घेतात याकडे  सर्वांचे लक्ष लागून आहे.


    Tags