logo

BREAKING NEWS

मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून सय्यद क्लासेसची तोडफोड

नांदेड, मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज शहरातील पाटनूरकरनगर येथील सय्यद कोचिंग क्लासेसची तोडफोड केली.या बाबत भाग्यनगर पोलिसांनी आपल्या डायरीत नोंद घेतली आहे.

शहरातील पाटनूरकरनगर येथे भौतिकशास्त्र विषयाची सय्यद कोचिंग क्लासेसच्या नावाने खाजगी शिकवणी चालते. या क्लासेसचे संचालक सय्यद  यांनी शिकवणीमधील एका विद्यार्थिनीची छेड काढली असल्याची माहिती उघड झाल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास सय्यद कोचिंग क्लासची तोडफोड केली. तसेच क्लासेसचे संचालक सय्यद यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटनूरकरनगर मध्ये खळबळ उडाली. शहरातील खाजगी शिकवणीमध्ये यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून, मुलींची छेड काढणाऱ्या अशा शिकवणीच्या संचालकाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. तर यापुढे सय्यद क्लासेस चालू दिले जाणार नाहीत, असा इशाराही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी युवासेनेचे सचिन पवार, दिपक स्वामी, निखिलेश देशमुख, विकास कदम, ओंकार आढाव, सुदर्शन मुरकुटे, महेश देबडवार, गणेश जोशी, श्रीकांत पांडे, विजय वाघमारे यांची उपस्थिती होती.

युवासेनेचे कार्यकर्ते सय्यद कोचिंग क्लासेसच्या ऑफिसची तोडफोड करुन गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजयुमोचे अध्यक्ष दिलीप सोढी यांच्या नेतृत्वाखाली सय्यद कोचिंग क्लासेच्या जुन्या कार्यालयात जावून त्याठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर काळे फासले. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष गोविंद यादव, बबलू यादव, शैलेश ठाकूर, उमेश सरोदे, प्रणय गंभिरे, विजय वाघमारे, अमोल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान छेडछाडीचा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत असले तरी उशिरापर्यंत भाग्यनगर पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. 

    Tags