logo

BREAKING NEWS

6 व्या दिवशी गोदावरी पात्राच्या शेजारी अजून एक युवकाचा झाला खून

गोदावरी पात्राच्या शेजारी सापडलेल्या अनोळखी मयताची ओळख पटली

नांदेड, 5 मे रोजी नांदेड शहरातील गोदावरी नदीच्या काठावर एक अनोळखी युवकाचा खून करण्यात आला होता, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. आज 11 मे रोजी सकाळी 7 वाजता नागिनघाट जवळील गोदावरी पात्राच्या पायऱ्यांवर एक अनोळखी युवक मृतावस्थेत सापडला आहे. त्याचे डोके फोडलेले दिसत असून, त्याचे नाव आशिष भालचंद्र काठोळे रा.पी.एन कॉलेज जवळ असा त्याचा पत्ता आहे 5 मे रोजीच्या युवकाच्या खून प्रकरणात सुद्धा डोके फोडलेले होते.

आज सकाळी  7 वाजता गोवारी नदीकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पूर्व पश्चिम असा झोपलेल्या अवस्थेत एक अनोळखी युवक सापडला.पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे,वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या सह अनेक अधिकारी - कर्मचारी या ठिकाणी पोहचले आहेत. मयत अनोळखी युवक हा 30 - 35 वर्ष वयाचा दिसतो आहे.त्याने घातलेले कपडे आणि रक्तरंजित चेहरा पाहून कोणी यास ओळखत असेल तर वारीत प्रभावाने वजिराबाद पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी तसेच वजिराबादचा दूरध्वनी क्रमांक 02462 236500 यावर सुद्धा माहिती देता येईल असे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले आहे. 5 मे रोजी करण्यात आलेला अनोळखी युवकाचा खून आणि 6 व्या दिवशी दिवशी झालेला हा दुसरा युवकाचा खून करण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे. आज सापडलेल्या मयत युवकाच्या खिश्यात होंडा कंपनीचे एक जॉब कार्ड सापडले आहे त्यावर आशिष भालचंद्र काठोळे असे नाव आहे.रा.सहयोग नगर,नांदेड असा पत्ता लिहिलेला आहे. स्कुटी क्रमांक एम एच 26 ए जी 802 असा स्कुटीचा क्रमांक आहे.या गाडिसिजे काम 8 मे रोजी कंपनीत केलेला आहे ती पांढऱ्या रंगाची स्कुटी तेथेच सापडली आहे. 

    Tags