logo

BREAKING NEWS

लग्न समारंभासाठी आलेल्या एका तरुणावर चाकूने हल्ला

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील घटना

नायगाव बाजार, लग्न समारंभासाठी आलेल्या एका तरुणावर चाकूने हल्ला करुन गंभीर जाखमी केल्याची घटना काल रविवारी दुपारी बरबडा ता. नायगाव येथे घडली. हल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून जखमीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेची माहीती समजताच पोलीस यंत्रणा बरबडा येथे पोहोचली असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नायगाव तालुक्यातील राहेर येथील शेख खाजा एकबाल शेख (२३) हा बरबडा येथे पाहूण्यांच्या घरी लग्न असल्याने लग्नासाठी आला होता. पण बरबडा येथीलच माधव (सोन्या) शिवाजी पवार या तरुणासोबत वाद झाला. आणि काही कळण्याच्या आतच सोनाजी पवारने त्या मुस्लिम तरुणाच्या मानेवर धारधार चाकूने हल्ला केला व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून. जखमी शेख खाजा यास नागरिकांनी तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची माहीती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे व कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी फोजफाट्यासह बरबडा येथे दाखल झाले आहेत. माधव पवारने चाकूने हल्ला का केला याची चौकशी करण्यासाठी शिवाजी पवार व त्याच्या आईला विचारपूस करुन सोनाजी कुठे फरार झाला याची माहीती घेतली व आरोपीच्या अटकेसाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

    Tags