logo

मुखेड, तालुक्यातील मौ.शिकारा येथे अस्मिता गॅस एजन्सीचे घरगुती गॅस सिंलीडर लिकिज होवून अचानक पेट घेवून स्फोट झाल्याची घटना दि.19 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडल्याने या स्फोटात तीन घरे जळुन खाक झाली असून, कोणतीही जीवीत हाणी झाली नाही. 

मुखेड तालुक्यातील शिकारा येथील संदिप रामा बनसोडे यांच्या राहत्या घरातील उज्वला गॅस योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडर लिकीज होवुन स्फोट झाल्याचा आरोप संदिप बनसोडे यांनी केला आहे. मुखेड तालुक्यातील अनेक गरिब व गरजू लोकांना या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात गॅस कनेक्शन देण्यात येत आहे. पण संदिप रामा बनसोडे यांच्या राहत्या घरातील गॅस ग्राहक क्रं.71900134 हे सिलेंडर अचानकपणे लिकीज होवून स्फोट झाल्याने गावात एकच खळबळ उडाली  आहे. गावातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने मुखेड येथील नगरपरिषदेचे अग्नीशामक वाहनांच्या दलांना तहसिलदार अतुल जटाळे यांनी घटनास्थळी जाण्याचे आदेश दिल्यामुळे गावातील आगीचे संकट टळले आहे.

या आगीत घरातील ज्वारी, तांदुळ, गहू, तुर, पैसे, सोने, फ्रिज, टि.व्ही. यासह घरातील मुलभूत साहित्य जळून खाक झाल्याने तीन घरातील संसार उघड्यावर पडले आहे. या आगीत सुमारे 10 लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते आहे. या घटनेचे माहिती तहसिलदार अतुल जटाळे यांना मिळताच यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी मंडळाधिकारी व्ही.एम.कोणेरी, तलाठी एस.डी.लोकरे यांना पाठवून घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदरील घटनेचा सविस्तर पंचनामा यावेळी करण्यात आला. स्फोटात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शिकारा येथील शिवकुमार इमडे, रामेश्र्वर चिटगीरे, उत्तम बनसोडे, लक्ष्मण इमडे, भगवान डुमणे, अंगद इमडे, शंकर देवमारे, माधव जाधव, रामदास बनसोडे, सिध्दार्थ बनसोडे, पांडुरंग तोतरे, सुर्यकांत कामनासे, ज्ञानेश्र्वर देवमारे, अकबर शेख, प्रकाश बनसोडे यांनी मदत केली. तर मुखेड नगरपरिषदेतील अग्निशामक दलाने महत्वपुर्ण कामगिरी बजावत इतर ठिकाणी आग लागू नये यासाठी शर्तीचे प्रयत्न करुन संपूर्ण आग विझवण्यात यशस्वी झाले. मात्र अस्मिता गॅस एजन्सीकडून ग्राहकांना देण्यात येणार्‍या गॅस जोडणीत रेग्यूलेटर, पाईप व इतर साहित्य हे निकृष्ट दर्जाचे देण्यात येत असल्याने कारणाने भविष्यातही मोठ्या प्रमाणावर स्फोटाचे प्रमाण वाढू शकतात ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाची सेवा ग्राहकांना देणार्‍या गॅस एजन्सीची चौकशी करुन ग्राहकांना चांगल्या दर्जाची साहित्य व सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी आगपिडीत संदिप बनसोडे यांनी केली.

    Tags