logo

हदगांव, नाफेड मार्फत शासनाने मार्च महिण्यात तुरीची खरेदी सुरू केली होती पण कामचुकार अधिकाऱ्यांमुळे अवघ्या १५ दिवसात बंद झाली होती. शेवटी आ. आष्टीकर यांनी आपली प्रतीष्ठा पणाला लावून पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या मध्यस्थीने थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून ऊद्या दि. २० पासून तूर खरेदी करण्याचे आदेश काढण्यास भाग पाडले. त्यामुळे दि. २२ सोमवार पासून हदगांवचे तूर खरेदी केंद्र नियमीत सुरू होणार असल्याचे अधिकृत वृत आहे.

मागील वर्षी तुरीच्या डाळीचे भाव कडाडल्यामुळे मुख्यमंत्रयांच्या आवाहनाला प्रतीसाद देत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर पिकवली म्हणून या वर्षी तूरीचे भाव गडगडले. शासनाने ठरवलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा बाजारभाव सरासरी एक ते दिड हजार रुपयांनी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. अखेर जनतेच्या रेट्यामुळे शासनाने जानेवारी महिण्या पासून राज्यात नाफेड मार्फत तूरीची खरेदी सुरू केली. पण हदगांवचे तुर खरेदी केंद्र मार्च महिण्यात सुरू झाले आणि दोन आठवडे चालून तिसऱ्या आठवड्यात बंद झाले. या एका पंधरवड्यात नाफेडच्या अधिकाऱ्यांनी रडत-पडत केवळ ३९०० क्विंटल तूर खरेदी केली. दरम्यान एका कामचुकार अधिकाऱ्यांने हदगांव येथे करमत नसल्यामुळे चक्क हदगांव बाजार समिती यार्डात तूरच ऊपलब्ध नसल्याचा अहवाल नाफेडच्या मुंबई कार्यालयाला पाठववून पक्की खुट्टी मारली. त्या अधिकाऱ्यांने मारलेली मेख काढायला आ. आष्टीकर यांना चक्क दोन महिने पालकमंत्री, पणन मंत्री, व अखेर मुख्यमंत्री यांचे ऊंबरवठे झिजवावे लागले, दरम्यान हदगांव येथील नाफेडचे तूर खरेदी केंद्र बंद झाल्याचा फायदा घेऊन येथील व्यापाऱ्यांनी ३५०० ते ३७०० अशा कवडीमोल दराने तुरीची खरेदी केरून शेतकऱ्यांना अक्षरश: लुटले. तुरीचा दर मागील वर्षी १० ते ११ हजार रुपये होता. तुरीची आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५०५० रुपये प्रति क्विंटल असतांना व्यापाऱ्यांनी एक ते दिड हजार रुपयांनी लुट केली गेली. मात्र शेकऱ्याना अधिकृत हिसाबपट्टी न देता कोऱ्या कागदावर खरेदी केलेल्या धान्याचे नाव न लिहता हिसाब दिल्या जातो. हदगांव बाजार समिती अंर्गत कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नसल्या प्रमाणे केवळ पैसे कमावण्यासाठी प्रशासकाकडून खाजगी लोकांमार्फत बाजार फी वसूल केल्या जाते. त्यामुळे तुरीचे खरेदी केंद्र सुरू होणे ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब समजल्या जात आहे. 

आ. आष्टीकर यांचे पाठीच्या मणक्याचे आॅपरेशन मुबई येथील जे.जे. रुग्णालयात होणार होते पण त्यांनी आॅपरेशनची तारीख पुढे ढकलून आगोदर तुर खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रश्न मार्गी लावल्या शिवाय आॅपरेशन करणार नाही असे सांगून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अर्जून खोतकर यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस याची भेट घेतली. त्यामुळे अखेर हदगांवचे तुर खरेदी केंद्र सुरू करण्यात यश मिळवले. अशी माहिती आ. आष्टीकर यांचे स्वीय सहय्यक बंडू पाटील आष्टीकर यांनी सांगीतले. मुख्यमंत्र्यांनी ऊद्या दि. २० पासून हदगांवचे तुर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेशीत केले. परंतू मुख्यमंत्र्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केवळ औपचारीक शुभारंभ करून दि. २२ पासून तूर खरेदी नियमीत सुरू केली जाणार आहे.

    Tags