Breaking news

गोदावरी नदीपात्रात सापडले आहे अनोळखी 30-35 वर्षीय युवकाचे प्रेत

नांदेड(खास प्रतिनिधी)आज दिनांक 17 मार्च रोजी दुपारी गोदावरी नदीत एका 30-35 वर्षीय अनोळखी युवकाचे प्रेत सापडले आहे.नांदेड ग्रामीण पोलीस नातलगांचा शोध घेत आहेत.

आज दुपारी 3 वाजे दरम्यान नांदेडच्या जुन्या पुलाखाली एक प्रेत तरंगताना दिसले.जीव रक्षक दलाच्या मदतीने नांदेड ग्रामीण पोलिसांनी ते प्रेत नदी बाहेर काढले आणि त्या बाबत अकस्मात मृत्यू दाखल करून तपास पोलीस हवालदार हणमंत बोंबले यांच्या कडे देण्यात आला आहे.हणमंत बोंबले यांचा मोबाईल क्रमांक 9923704956 असा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मयत अनोळखी युवकाचे वय 30 ते 35 वर्ष आहे.त्याने पांढरा रेघाला शर्ट आणि क्रीम रंगाची पॅण्ट परिधान केलेली आहे.नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी जनतेला आवाहन केले आहे की,कोणी या मयत अनोळखी युवकास ओळखत असेल तर त्यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांना या बाबत माहिती द्यावी.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक 02462 226373 असा आहे.

Related Photos