दंत अभ्यासासाठी लोहयाचे भुमिपुत्र डॉ दिनेश चव्‍हाण जर्मनीत

लोहा(प्रतिनिधी)लोहयाचे भुमिपुत्र डॉ दिनेश माणिकराव चव्‍हाण हे जर्मनी येथील कोलन शहरात दंत विषयक प्रबंध सादर करणार आहेत तसेच कत्रीम दात विषयक त्‍यांना जर्मनीची फेलोशिप मिळणार आहे. दाताच्‍या अभ्‍यासासाठी विदेशात जाणारे ते पहिले भुमिपुत्र आहेत. दि २१ मार्च ते २ एप्रील असे १२ दिवस या शहरात ते दंत विषयक वेगवेगळया शस्‍त्रक्रिया अभ्‍यासनार आहेत. जागतीक पातळीवरील दंत परिषदेत आपला शोध निबंधाचे सादरीकरण करणार आहेत.

लोहयाचे भुमिपुत्र दंत शल्‍यचिकित्‍सक माजी नगराध्‍यक्षा जिजाबाई मुकदम यांचे नातु डॉ दिनेश माणिकराव चव्‍हाण – मुकदम हे २१ मार्च ते ०२ एप्रील या काळात जर्मनी येथील कोलन या शहरात जागतीक दंत परिषदेला उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोबॉट स्‍कोरींग यांच्‍या कडे कत्रीम दंत रोपन या फेलोशिप घेणार आहेत. अत्‍याधुनिक तंत्रज्ञान अवगत करून दंतविषयक वेगवेगळी माहीती अभ्‍यासनार आहेत. तसेच दंतपरिषदेत शोध निबंध सादर करणार आहेत त्‍यांच्‍या या ज्ञानाचा नांदेड जिल्‍यातील दंत रोग्‍यांना मोठा लाभ होणार आहे. विदेशात जाउन शोध निबंध सादर करणारे हे गोदा- मन्‍याड खो-यातील पहीले दंत शल्‍य चिकित्‍सक आहेत. या त्‍यांच्‍या या विदेश अभ्‍यास दौ-यानिमीत्‍त आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर, केशवराव मुकदम, नारायणराव मुकदम, प्रा. टेंगसे , माजी नगरअध्‍यक्ष किरण वटटमवार, रामभाउ चन्‍नावार, छत्रपती धुतमल, शरद पाटील पवार, दिनेश तेललवार,शेषराव पाटील चव्‍हाण,माजी सहकार अधिकारी आप्‍पाराव चव्‍हाण हरिभाउ चव्‍हाण, संजय मक्‍तेदार,हरिहर धुतमल, सचिन मुकदम, दिपक कानवटे, नारायण पवार , राजु मुकदम, यासह अनेकांनी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

Related Photos