Breaking news

महामार्गावरील मद्यविक्री ३१ मार्चनंतर बंद ; पर्यायी जागा शोधण्यासाठी मद्य विक्रेत्यांची धवपळ

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावरील दारुविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने महामार्गावरील सर्व प्रकारच्या मद्यविक्रीचे दुकाने ३१ मार्च नंतर बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळेे तालुक्यातील ३७ मद्य विक्रेत्यावर गंडातर येणार असल्याने चालक व मालकांची चांगलीच भंबेरी उडाली असून. स्थलांतरासाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली आहे मात्र स्थलांतराबाबद शासनाचे कोणतेही आदेश नाहीत.

सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे दारु विक्री सुरू करण्यास बंदी घालणारा आदेश १५ डिसेंबर २०१६ रोजी राज्य सरकारला दिला. त्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग या ठिकाणी होत असलेल्या दारुविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात नमुद केले होते. न्यालयाच्या या आदेशानंतर मद्य विक्रेते चांगलेच धास्तावले होते पण मद्यविक्रीतून दांडगा महसूल शासनाला मिळत असल्याने राज्य शासन काहीतरी मार्ग काढील असे सर्वच मद्य विक्रेत्यांना वाटत होते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होणारच नाही असा अंदाजही व्यक्त केल्या जात होता. म्हणून मद्य विक्रेते निर्धास्त होते परंतु उत्पादन शुल्क विभागाने १५ मार्च नंतर नोटीसा बजावण्यास सुरुवात केल्याने मद्य विक्रेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली. कोणत्याही परिस्थितीत महामार्गावरील मद्य विक्री बंद होणार याचा त्यांना अंदाज आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून. न्यायालयाच्या निर्देशानुसार बिलोलीच्या उत्पादन शुल्क विभागही कामाला असून. महामार्गावर असलेल्या नायगाव तालुक्यातील ३७ मद्यविक्रेत्यांना नोटीसी बजावून ३१ मार्च नंतर सर्वोच्च न्यालयाच्या निर्देशानुसार परवान्याचे नुतणीकरण करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मद्य विक्रेते राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून दुर व सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. जिल्हा मार्गावर असलेल्या व ग्रामीण भागातील अंतर्गत पण सोयीची जागा शोधल्या जात आहे. नायगाव तालुक्यातील नरसी फाटा या गावाला चौरस्ता असून तेथेच सर्वात जास्त मद्य विक्रीची दुकाने आहेत. आणि येथे ५०० मिटरच्या पुढे परिसरच नसल्याने येथील मद्य विक्रेत्यांचे मात्र चांगलीच गोची झाली आहे. सर्वोच्च न्यालयाच्या या निर्णयाने महामार्गावरील व मुख्य ठिकाणचे मद्य विक्रीचे दुकाने ३१ मार्च नंतर बद होतील त्यामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल तर बुडणार आहेच पण पान टप-या,मटन खानावळीसह अनेक ठिकाणी अनाधिकृत मद्यविक्री वाढेल असा अनेकांनी अंदाज वर्तवला आहे.

नायगाव तालुक्यातील ३९ दुकानापैकी केवळ २ दुकाने या कारवाईतून वाचत असून तब्बल ३७ दुकाने ३१ मार्च नंतर बंद होणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात येत असून दुकानाचे स्थलांतरासाठी परवानगी देण्यासाठी शासनाचे कुठलेच दिशा निर्देश आले नाहीत. त्यामुळे आम्ही ३१ मार्च नंतर परवान्याचे नुतणीकरण करणार नसल्याच्याच नोटीसा मद्य विक्रेत्यांना बजावत आहोत.
बि.एस. मंडलवार, उपनिरिक्षक, उत्पादन शुल्क विभाग,

Related Photos